Video: 'मस्करी खूप झाली आता मुद्द्याचं बोल'; जेव्हा रिपोर्टरने घेतली होती शाहरुखची शाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 05:48 PM2023-10-10T17:48:48+5:302023-10-10T17:49:20+5:30

Shahrukh khan: शाहरुखने सुद्धा या रिपोर्टरला त्याच्याच शब्दांत उत्तर दिलं. म्हणाला...

when-a-reporter-asked-shah-rukh-khan-to-behave-seriously-this-is-how-actor-shut-his-mouth-video | Video: 'मस्करी खूप झाली आता मुद्द्याचं बोल'; जेव्हा रिपोर्टरने घेतली होती शाहरुखची शाळा

Video: 'मस्करी खूप झाली आता मुद्द्याचं बोल'; जेव्हा रिपोर्टरने घेतली होती शाहरुखची शाळा

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान त्याच्या दमदार अभिनयशैली आणि हजरजबाबीपणा यामुळे कायम चर्चेत येत असतो. त्यामुळे बऱ्याचदा चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तो हटके उत्तरं देत चर्चेत येतो. परंतु, काही वेळा तो अशी उत्तरं देतो ज्यामुळे समोरच्या माणसाची बोलती बंद होते. सध्या शाहरुखचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एका रिपोर्टरने शाहरुखची शाळा घेतली. मात्र, या रिपोर्टरला शाहरुखने त्याच्याच भाषेत उत्तर दिलं.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ जुना आहे. हा व्हिडीओ २०१२ सालचा असून जब तक है जान या सिनेमाचं शाहरुख प्रमोशन करत होता. या प्रेस कॉन्फरन्समध्ये एका पत्रकाराने शाहरुखला त्याच्या बर्थ डे प्लॅनविषयी प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत शाहरुख मस्करी करत होता. मात्र, शाहरुखची ही मस्करी पाहून अन्य दुसरा एक रिपोर्टर वैतागला आणि त्याने शाहरुला खोचक शब्दांत सुनावलं.

'शाहरुख मज्जामस्ती खूप झाली. पण, आता मुद्द्याचं सिनेमाविषयी काही तरी सांग', असं एक रिपोर्टर थेटपणे बोलला. त्यावर, "तुम्ही विचारा ना काहीही", असं शाहरुख म्हणाला. त्यावर, 'या सिनेमाविषयी थोडं खुलून बोल. अजून काही तरी सांग या सिनेमाविषयी', असं या रिपोर्टरने म्हटलं. त्यावर, रिपोर्टरचा हा सूर ऐकल्यानंतर शाहरुख थोडा नाराज झाला होता. मात्र, तरीदेखील त्याने शांतपणे या प्रश्नांची उत्तरं दिली.

दरम्यान, या रिपोर्टरने जे जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं शाहरुखने ताबडतोब दिली. इतकंच नाही तर रिपोर्टरकडचे प्रश्न संपल्यानंतरही शाहरुख त्याला आणखी प्रश्न विचार असं म्हणू लागला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर शाहरुखचा हा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे.
 

Web Title: when-a-reporter-asked-shah-rukh-khan-to-behave-seriously-this-is-how-actor-shut-his-mouth-video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.