​५०० व १००० च्या नोटा बंद होताच लोकांना आठवली ‘कॅट’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 13:31 IST2016-11-09T13:31:17+5:302016-11-09T13:31:17+5:30

५०० व १००० च्या नोटा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाने बॉलिवूडही ढवळून निघाले. बॉलिवूड सेलिब्रिटींनी या मुद्यावर वेगवेगळी मते नोंदवली.पण ...

When the 500 and 1000 notes were closed, people remembered 'CAT' !! | ​५०० व १००० च्या नोटा बंद होताच लोकांना आठवली ‘कॅट’!!

​५०० व १००० च्या नोटा बंद होताच लोकांना आठवली ‘कॅट’!!


/>
५०० व १००० च्या नोटा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाने बॉलिवूडही ढवळून निघाले. बॉलिवूड सेलिब्रिटींनी या मुद्यावर वेगवेगळी मते नोंदवली.पण बॉलिवूडची एक सेलिब्रिटी या निर्णयानंतर अचानक ट्रेंडमध्ये आली. ही सेलिब्रिटी म्हणजे कॅटरिना कैफ. होय, कॅटरिना आणि ‘चिकनी चमेली... ’ हे तिचे आयटम साँग काल रात्री सर्वाधिक सर्च केले गेले.  होय, ‘मैं बारिश कर दूं पैसे की गर तू हो जाय मेरी’, असे कधीकाळी अक्षय कुमार कॅटरिना कैफला म्हणाला होता. काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद केल्या आणि लोकांना अक्षयच्या गाण्यातील हीच कॅट आठवली. त्यामुळे तिला इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केले गेले.
५०० व १००० च्या नोटा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाने काल रात्रीपासून खळबळ माजली. अचानक झालेल्या या घोषणेने लोकांना काळजीत टाकले. पण त्याचवेळी या घोषणेनंतर सोशल मीडियावर जोक्सचा पूर आला. अशाच एका जोक्ससाठी कॅटरिनाचे ‘चिकनी चमेली... ’ हे गाणे इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केले गेले. असे यासाठी कारण ‘अग्निपथ’मधील या गाण्यात ‘नोट हजारों का खुल्ला छुट्टा कराने आई...’अशी एक ओळ आहे. लोकांना नेमकी हीच ओळ आठवली आणि त्यांनी इंटरनेटवरून या गाण्याचे क्लिप काढून ते एकमेकांशी शेअर केले.


 
 

Web Title: When the 500 and 1000 notes were closed, people remembered 'CAT' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.