'अमृताच्या जीवावर बेतला असता सैफचा प्रँक'; साराने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 08:59 AM2024-04-13T08:59:23+5:302024-04-13T09:02:37+5:30

Sara ali khan: सैफने त्याच्या मित्रांसोबत प्रँक करायचं ठरवलं होतं. मात्र, ऐनवेळी त्याने अमृतावरच प्रँक केला.

what-would-have-happened-that-day-that-sara-ali-khans-mother-would-have-been-shot | 'अमृताच्या जीवावर बेतला असता सैफचा प्रँक'; साराने केला खुलासा

'अमृताच्या जीवावर बेतला असता सैफचा प्रँक'; साराने केला खुलासा

बॉलिवूडमधील नवाब कुटुंबीय अर्थात अभिनेता सैफ अली खान (saif ali khan)आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. यात खासकरुन त्याची लाडकी लेक सारा अली खान (sara ali khan) ही तर कायमच पापाराझी आणि चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. साराने तिच्या साध्या आणि मनमिळाऊ स्वभावामुळे अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे आज ती अनेकांनी आवडती अभिनेत्री आहे. सध्या सोशल मीडियावर साराची एक मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आईवर म्हणजेच अभिनेत्री अमृता सिंग (amrita singh) हिच्यावर ओढावलेल्या एका प्रसंगाविषयी भाष्य केलं आहे.

अलिकडेच साराने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आईचा सिंगल मदर म्हणून केलेला स्ट्रगल कसा होता हे सांगितलं.यावेळी बोलत असतांना सैफचा प्रँक अमृताच्या जीवावर बेतला असता असंही तिने सांगितलं. कारण, अमृताला बंदुकीची गोळी लागता लागता थोडक्यात वाचली होती.

नेमकं काय घडलं होतं अमृतासोबत?

साराने तिच्या आई-वडिलांच्या म्हणजेच सैफ आणि अमृता यांच्या स्वभावाविषयी भाष्य केलं. त्यांचे काही जुने किस्से तिने यावेळी सांगितले. त्यानुसार, एकदा अमृतासोबत प्रँक करणं सैफला चांगलंच महागात पडलं असतं. कारण, थोडक्यात तिचा जीव बचावला होता.

"माझ्या आई-वडिलांनी चेहऱ्यावर बूट पॉलिश लावून त्यांच्या मित्रांसोबत प्रँक करायचं ठरवलं होतं. पण, ऐनवेळी माझ्या वडिलांनी (सैफ) आईला (अमृता) त्यांच्या मित्राच्या खोलीत ढकललं आणि, दरवाजा बाहेरुन लावून घेतला. ज्या रुममध्ये माझ्या आईला ढकललं होतं ती रुम आईची मैत्रीण नीलू मर्चंट यांची होती", असं सारा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "माझी आई ज्यावेळी त्या रुममध्ये गेली त्यावेळी नीलू आणि तिचा पती आराम करत होते.आणि, अचानक रुममध्ये कोणीतरी आलंय हे पाहून नीलूच्या नवऱ्याने त्यांची बंदूक काढली आणि त्यांनी आईवर ती बंदूक रोखली.  ते गोळ्या झाडणार होते. तितक्यात आईने पटकन तिचे दोन्ही हात वर केले आणि, मारु नका मी डिंगी आहे असं ओरडली. आणि, होणारा अनर्थ टळला."

दरम्यान, साराने पहिल्यांदाच तिच्या आई-वडिलांविषयीचा हा किस्सा सांगितला. सैफ आणि अमृता काही वर्षांपूर्वीच विभक्त झाले आहेत. घटस्फोटानंतर अमृताने सारा आणि इब्राहिम या दोन्ही मुलांचा एकटीने सांभाळ केला. साराने अल्पावधीत बॉलिवूडमध्ये तिचं स्थान निर्माण केलं आहे. साराने केदारनाथ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं आणि पाहता पाहता ती लोकप्रिय झाली.

Web Title: what-would-have-happened-that-day-that-sara-ali-khans-mother-would-have-been-shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.