​सलमान खानच्या नो एंट्री या चित्रपटाच्या सिक्वलचे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 17:21 IST2017-02-02T11:51:11+5:302017-02-02T17:21:11+5:30

सलमान खान, अनिल कूपर, फरदीन खान यांच्या नो एंट्री या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. एक चांगला ...

What will happen to the sequel of Salman Khan's No Entry? | ​सलमान खानच्या नो एंट्री या चित्रपटाच्या सिक्वलचे काय होणार?

​सलमान खानच्या नो एंट्री या चित्रपटाच्या सिक्वलचे काय होणार?

मान खान, अनिल कूपर, फरदीन खान यांच्या नो एंट्री या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. एक चांगला कॉमेडी चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाते. हा चित्रपट हिट झाल्यानंतर या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा करण्यात आली होती. नो एंट्री हा चित्रपट 2005मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आता 12 वर्षं होत आली असली तरी या चित्रपटाच्या सिक्वलचा काहीही पत्ता नाहीये. 
नो एंट्री या चित्रपटाच्या सिक्वलची गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षक वाट पाहात आहेत. 2014मध्ये या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा झाली होती. या चित्रपटात सलमान खान, फरदीन खान आणि अनिल कपूरच प्रमुख भूमिकेत झळकणार होते असे ठरले होते. केवळ बिपाशा बासू, सेलिना जेटली, इशा देओल आणि लारा दत्ता यांची जागा चित्रगंधा सिंग आणि इशा गुप्ता घेणार असल्याची चर्चा होती. 2015मध्ये या कास्टला घेऊन चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्याचे ठरले होते. पण यासाठी सलमान खानने तारखा देण्याची ते वाट पाहात होते. 
माझी कथा, माझे अभिनेते सगळे काही तयार आहे. आम्ही आमच्या चित्रीकरणाला कधीही सुरुवात करू शकतो. केवळ सलमान या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये असणार की नाही याचा निर्णय तोच घेणार आहे असे बोनी कपूरने 2015मध्ये म्हटले होते. पण आता काही कारणांमुळे नो एंट्रीचा सिक्वल बनवला जाणार नसल्याची चर्चा आहे. सलमान खान आणि बोनी कपूर यांच्यात काही आर्थिक बाबींवरून एकमत न झाल्याने चित्रपट रखडला असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता हा चित्रपट बनणेच कठीण असल्याचे म्हटले जात आहे. 

Web Title: What will happen to the sequel of Salman Khan's No Entry?