काय आहे सनी लिओनीची इच्छा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 16:57 IST2016-12-01T16:57:05+5:302016-12-01T16:57:05+5:30

बॉलिवूडची ‘हॉट अ‍ॅण्ड सेक्सी’ अभिनेत्री सनी लिओनी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत नाही. ती कुठे हरवलीये अशी चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये सुरू ...

What is Sunny Leone's wish? | काय आहे सनी लिओनीची इच्छा ?

काय आहे सनी लिओनीची इच्छा ?

लिवूडची ‘हॉट अ‍ॅण्ड सेक्सी’ अभिनेत्री सनी लिओनी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत नाही. ती कुठे हरवलीये अशी चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये सुरू आहे. मुंबईत नुकतीच ती एका मोबाईल अ‍ॅप लाँचिंग सोहळ्यात उपस्थित झाली होती. यावेळी ती म्हणाली,‘ सोनम कपूर आणि रणवीर सिंग यांना मला सोशल मीडिया आणि अ‍ॅपवर बघायला आवडते.’ 



रणवीर सिंग आणि सोनम कपूर यांचे चाहते काही कमी आहेत का? त्यात आता सनी लिओनीची भर पडलीये. ती म्हणते,‘ मला सोनम कपूरला वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना पाहणं प्रचंड आवडतं. तिच्याप्रमाणेच मला रणवीर सिंगही खुप आवडतो. तो खरंच फनबॉय आहे. त्याला फॅशनचा सेंस आहे. ज्या स्टाईलचे ड्रेसेस तो घालतो ते केवळ त्यालाच सुंदर दिसतात.’ यावेळी तिच्या चाहत्यांसोबत तिने संवाद साधला. जगभरातील तिच्या फॅन्सला ती फेसबुक, टिवटर, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संवाद साधते. सनी ही ‘बी टाऊन’ची पहिली सेलिब्रिटी आहे जिच्याकडे हे अ‍ॅप आहे. 



पूर्वाश्रमीची पोर्नस्टार म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सनी लिओनी आज ‘बी टाऊन’च्या हॉट अभिनेत्रींपैकी एक समजली जाते. चित्रपटात तिने आत्तापर्यंत साकारलेले गाणे हे रसिकांना त्यांच्या तालावर नाचायला भाग पाडतात. ‘बेबी डॉल’ हे गाणे पाहताच त्याचा ह्रिदम आणि सनीचा हॉट अंदाज चाहत्यांना ठेका धरायला लावतो. 

Web Title: What is Sunny Leone's wish?