अर्जूनसोबत काय संबंध? मलायका अखेर बोलली!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 16:19 IST2016-11-23T12:59:38+5:302016-11-23T16:19:57+5:30
अरबाज खान व मलायका अरोरा यांचे दुरावलेले नाते लवकरच कायदेशीररित्या संपुष्टात येणार आहे. दोघांनीही कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी रितसर अर्ज ...

अर्जूनसोबत काय संबंध? मलायका अखेर बोलली!!
अ बाज खान व मलायका अरोरा यांचे दुरावलेले नाते लवकरच कायदेशीररित्या संपुष्टात येणार आहे. दोघांनीही कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी रितसर अर्ज केल्याचे कळतेय. अरबाज व मलायका यांच्यात घटस्फोट म्हणजे निश्चितपणे मलायका व अर्जून कपूर यांतील अफेअरच्या चर्चेला जोर चढणार. पण कदाचित मलायकाच्या एका नव्या खुलाशानंतर ही चर्चा थांबणार. होय, एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत मलायकाने तिच्या व अर्जूनच्या संबंधांबद्दल खुलासा केलाय.
![Arjun Kapoor]()
अरबाजसोबत दुरावलेल्या संबंधांसोबतच मलायकाच्या अर्जूनसोबत वाढत्या जवळीकीची चर्चा ब-याच दिवसांपासून बी-टाऊनमध्ये रंगलीय. पण इतके असूनही मलायका व अर्जून यावर मौन बाळगून होते. पण सरतेशेवटी मलायकाने आपले मौन तोडत अर्जूनसोबत असलेल्या संबंधांबाबत खुलासा केला. अर्जून माझा खूप चांगला मित्र आहे. पण लोक भलते-सलते अर्थ काढतात, असे ती म्हणाली. मलायकाच्या या वाक्याचा अर्थ काढायचाच तर अर्जूनसोबत तिचे कुठलेही ‘अफेअर’ नाही. त्यांच्यात आहे ती केवळ एक सच्ची मैत्री.( किमान मलायकाने तसे सांगितल्यावर तरी त्यावर विश्वास ठेवायलाच हवा.)
![Malaika Arora separation with husband Arbaaz Khan]()
मलायका व अरबाज यांच्यात बिनसल्याची बातमी गतवर्षीच आली होती. या दुराव्यामागे अर्जून असल्याचेही बोलले जात होते. मात्र चालू वर्षाच्या सुरुवातीला या बातमीला दुजोरा मिळाला. अरबाज व मलायकाने एक ज्वाइंट स्टेटमेंट जारी करून आम्ही सध्या एकत्र राहत नसल्याचा खुलासा केला होता.मागच्या महिन्यात मात्र दोघांच्या कुटुंबियांनी मध्यस्थी करून त्यांची मनधरणी केल्याची चर्चा होती. नात्याला आणखी एक संधी देण्याचा त्यांनी निर्णय घेतला असून घटस्फोटाचा विचार सोडून दिल्याचे सांगण्यात आले. अनेक कार्यक्रमांना त्यांनी एकत्रित हजेरीसुद्धा लावली. त्यामुळे सर्व काही ठीक झाल्याचे वाटत होते. पण सर्वकाही ठीक होण्याआधीच दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.