तर काय महेश भट्ट आहेत ‘राजी’? मान्य आहे आलिया-रणबीरचे नाते??

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 10:51 IST2018-07-10T10:49:40+5:302018-07-10T10:51:53+5:30

होय, आधी आलिया रणबीरच्या कुटुंबासोबत डिनर डेटवर पोहोचली. मग रणबीरचे पापा ऋषी कपूर यांना भेटायला पोहोचली आणि आता रणबीर कपूर आलियाचे डॅड महेश भट्ट यांच्यासोबत दिसला.

what mahesh bhatt approved ranbir kapoor and alia bhatt relationship | तर काय महेश भट्ट आहेत ‘राजी’? मान्य आहे आलिया-रणबीरचे नाते??

तर काय महेश भट्ट आहेत ‘राजी’? मान्य आहे आलिया-रणबीरचे नाते??

बी टाऊनमध्ये सध्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या दोघांच्याच अफेअरची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांत दोघांमधील जवळीक चांगलीचं वाढली आहे. दोघांचे एकमेकांसोबतचे फोटोही व्हायरल होत आहेत. आता या दोघांसोबत त्यांची फॅमिलीही दिसू लागली आहे. होय, आधी आलिया रणबीरच्या कुटुंबासोबत डिनर डेटवर पोहोचली. मग रणबीरचे पापा ऋषी कपूर यांना भेटायला पोहोचली आणि आता रणबीर कपूर आलियाचे डॅड महेश भट्ट यांच्यासोबत दिसला.

महेश भट्ट, आलिया व रणबीर या तिघांचा एका फ्रेममधील फोटो पाहून सध्या वेगवेगळे तर्क काढले जात आहेत. खुद्द महेश भट्ट यांचे यावर काय मत आहे? हेच जाणून घेण्यासाठी मीडियाने महेश भट्ट यांना गाठले. पण त्यांनी हा प्रश्न नेहमीप्रमाणे मीडियाकडे टोलवला. ‘होय, मी तो फोटो पाहिलायं. तो फोटो पाहिला आणि मीडियाचे लोक आता घरापर्यंतही पोहोचलेत, असे मला जाणवले. कदाचित अख्ख्या देशाला केवळ आलिया अन् रणबीरमध्येचं इंटरेस्ट असावा. त्यामुळे मी फार काही बोलणार नाही. ‘पापा राजी है या नहीं,’ हे आता मीडियानेचं काय ते ठरवावे,’ असे महेश भट्ट म्हणाले.
महेश भट्ट आपल्या मुलींना त्यांच्या लव्ह लाईफबद्दल सल्ला देतात का, असा प्रश्न केला असता, त्यांनी नकार दिला. आलियाबद्दल म्हणाल, तर ती आता मोठी झालीय आणि तिचे रिलेशनशिप हा तिचा प्रश्न आहे. तिच्या रिलेशनशिपबद्दल तिलाचं निर्णय घ्यायचाय. याचे बरे वाईट परिणामही तिलाचं भोगायचे आहेत. हे तिचे आयुष्य आहे. मी आलियाचा मनापासून आदर करतो. तिला तिचे खासगी आयुष्य खासगी ठेवायला आवडते. माझी मोठी मुलगी पूजाने आपले खासगी आयुष्य कधीच लपवून ठेवले नाही. ती माझ्यासारखीचं व्यक्त होत राहिली. पण आलिया माझ्यापेक्षा वेगळी आहे, असे ते म्हणाले.
रणबीरबद्दलही ते बोलले. मला रणबीर आवडतो. त्याचा अभिनय आवडतो. ‘संजू’मधील त्याच्या अभिनयाने तर मी कमालीचा प्रभावित झालो. त्याच्यात युनिक चार्म आणि टॅलेंट आहे. तो ओरिजनल आहे. अगदी आलियासारखा ओरिजनल, असे ते म्हणाले.

 

Web Title: what mahesh bhatt approved ranbir kapoor and alia bhatt relationship