सारा अली खानचं आवडतं मराठी गाणं आणि मराठी पदार्थ कोणता? जाणून घ्या…

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 05:34 PM2024-03-10T17:34:52+5:302024-03-10T17:35:45+5:30

सारा आजच्या घडीला बॉलिवूडच्या सर्वत प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

What is Sara Ali Khan's favorite Marathi song and Marathi food? Find out… | सारा अली खानचं आवडतं मराठी गाणं आणि मराठी पदार्थ कोणता? जाणून घ्या…

सारा अली खानचं आवडतं मराठी गाणं आणि मराठी पदार्थ कोणता? जाणून घ्या…

अभिनेत्री सारा सैफ अली खान हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सारा आजच्या घडीला बॉलिवूडच्या सर्वत प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. साराला काय आवडते काय नाही हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अभिनेत्री सारा अली खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला कोणता  गाणं आणि मराठी पदार्थ सर्वाधिक आवडतो याबद्दल सांगितले.

नुकतेच सारा अली खान ही 'झी चित्र गौरव' पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी तिनं सोनेरी काठ असलेली काळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. तर मोठे कानातले असा हटके लूक तिनं केला होता. लोकमत फिल्मीशी बोलताना साराला 'जेवलीस का?' असा प्रश्न केला. यावर ती हसून म्हणाली, 'होय मी खूप जेवली'. तसेच आवडत्या मराठी पदार्थाबद्दल विचारताच साराने 'पोहे' असं उत्तर दिलं.  सारा ही ‘खवय्या’ असून तिला विविध पदार्थांची चव चाखायाची फार आवड आहे.

सारा अली खानला तुझं आवडतं गाणं कोणतं? याबद्दल प्रश्न विचारला असता ती म्हणाली, “माझ्या खऱ्या आयुष्यात सध्या माझा दाजिबा नसला तरीही मला ‘ऐका दाजिबा’ या गाण्यावर डान्स करायला खूप आवडेल. याबतच तिने झी चित्र गौरव पुरस्काराला आमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती सध्या अगामी 'मर्डर मुबारक' व 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटांचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे.  येत्या १५ मार्चला तिचा 'मर्डर मुबारक' चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर पंकज त्रिपाठी, करिश्मा कपूर, विजय वर्मा, टिसका चोप्रा, डिंपल कपाडिया, संजय कपूर आणि सोहेल नय्यर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
 

Web Title: What is Sara Ali Khan's favorite Marathi song and Marathi food? Find out…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.