प्रियांका चोप्रा सोबत न्यूयॉर्कमध्ये घडले असे काही,स्वतःला सावरणेही झाले कठिण, काय आहे नेमके कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 14:36 IST2020-09-07T14:20:06+5:302020-09-07T14:36:15+5:30

प्रियंका चोप्रा व तिचा पती निक जोनास दोघेही संसारात आनंदी आहेत. 2018 मध्ये प्रियंका व निक लग्नबेडीत अडकले होते.

What happened to Priyanka Chopra in New York made it difficult for her to recover, what is the exact reason? | प्रियांका चोप्रा सोबत न्यूयॉर्कमध्ये घडले असे काही,स्वतःला सावरणेही झाले कठिण, काय आहे नेमके कारण

प्रियांका चोप्रा सोबत न्यूयॉर्कमध्ये घडले असे काही,स्वतःला सावरणेही झाले कठिण, काय आहे नेमके कारण

ट्रेंडिंग कपल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्याविषयी प्रत्येक बाब जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा असते. सध्या प्रियंकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत प्रियंका अस्वस्थ दिसते. हा फोटो पाहून तिची तब्येत बरी नसल्याचे तुम्हाला वाटेल. हा फोटो पाहून अनेकांनी वेगवेगळे कमेंटसद्वारे विविध प्रश्नचही विचारत आहेत. हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. खरंतर हा फोटो सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा आहे. प्रियांका कॉफी टेबलवर बसून काहीतरी खात असते. 

अचानक काही काही तरी पदार्थ प्रियंका चोप्राच्या गळ्यात अडकतो. आणि त्यामुळे कासाविस झालेल्या प्रियंकाला अभिनेता अ‍ॅडम डेव्हिन तिला सांभाळतो. प्रियंकाला अस्वस्थ वाटू लागते त्यातून तो तिला वाचविण्याचा प्रयत्न करतो. असा तो सिनेमातला सीन होता. हा सीन न्यूयॉर्क मधील एका रेस्टोरंटमध्ये शूट करण्यात आला होता. याच सीनचे हे फोटो असून इंटरनेटवर तुफान वायरल झाले होते. 

तूर्तास प्रियंका चोप्रा व तिचा पती निक जोनास दोघेही संसारात आनंदी आहेत. 2018 मध्ये प्रियंका व निक लग्नबेडीत अडकले. हिंदू व ख्रिश्चन पद्धतीने दोघांनीही लग्नगाठ बांधली. प्रियंका पतीपेक्षा 11 वर्षांनी मोठी आहे. शिवाय प्रॉपर्टीच्या बाबतीतही ती निकच्या कितीतरी पुढे आहे. प्रियंका सुमारे 200 कोटींच्या प्रॉपर्टीची मालकीन आहे. तर निककडे 175 कोटींची प्रॉपर्टी आहे. प्रियंका आणि निक दोघांनाही लक्झरी लाईफ आवडते. दोघांकडेही महागड्या गाड्या आहेत, अलिशान बंगले आहेत.

लग्नानंतर प्रियंका व निक यांनी कॅलिफोर्नियात 144 कोटींचा एक अलिशान बंगला खरेदी केला होता. या बेडरूममध्ये 7 बेडरूम व 11 बाथरूम आहेत. प्रियंकाचा गोव्यातही एक बंला आहे. याची किंमत 20 कोटींच्या घरात आहे. मुंबईत प्रियंका ज्या ठिकाणी राहते त्या बंगल्याची किंमत 100 कोटी रूपये आहे.
  
 

Web Title: What happened to Priyanka Chopra in New York made it difficult for her to recover, what is the exact reason?