​टिनाचे काय झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 19:57 IST2016-05-10T14:27:21+5:302016-05-10T19:57:21+5:30

अभिनेता गोविंदाची मुलगी नर्मदा बॉलिवुडमध्ये झळकणार असल्याची कित्येत महिन्यांपासून चर्चा आहे. चित्रपटात काम करण्यासाठी तिने आपले नाव बदलून टिना ...

What happened? | ​टिनाचे काय झाले?

​टिनाचे काय झाले?

िनेता गोविंदाची मुलगी नर्मदा बॉलिवुडमध्ये झळकणार असल्याची कित्येत महिन्यांपासून चर्चा आहे. चित्रपटात काम करण्यासाठी तिने आपले नाव बदलून टिना आहुजा ठेवले आहे.

टिनाने गेल्या वर्षी ‘सेकंड हँड हसबंड’ या पंजाबी चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीपासून टिना बॉलिवुडमध्ये काम करणार असल्याचे म्हटले जात होते.

या चर्चांना जवळजवळ दीड-दोन वर्षं उलटून गेली असली तरी अद्याप तिच्या बॉलिवुड पदार्पणाचा थांगपत्ताही नाही. चित्रपटांच्या कथा आवडत नसल्याने ती चित्रपट स्वीकारत नसल्याचे तिने काही महिन्यांपूर्वी म्हटले होते.

चित्रपट साईनही न करता तिच्या पदार्पणाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. त्यामुळे टिनाच्या बॉलिवुड पदार्पणाचे काय झाले हा खरंच चर्चेचा विषय बनला आहे.

Web Title: What happened?