अक्षयकुमार अखेर कोणती गुड न्यूज देणार आहे?, ट्विटमुळे खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 22:17 IST2017-09-01T16:47:01+5:302017-09-01T22:17:14+5:30
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तो नेहमीच काही ना काही शेअर करीत ...

अक्षयकुमार अखेर कोणती गुड न्यूज देणार आहे?, ट्विटमुळे खळबळ!
ब लिवूडचा खिलाडी अक्षयकुमार हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तो नेहमीच काही ना काही शेअर करीत असतो. आता त्याने असेच काहीसे एक ट्विट केले असून, ज्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. होय, अक्षयने ट्विटमध्ये लिहिले की, ‘अब तो एक्साइटमेंट से पेट में किक्स भी स्टार्ट हो गए है, कन्ट्रोल नहीं हो रहा. आय अॅम शोअर तुम्हीही हे जाणून घेण्यास उत्सुक आहात. कमिंग सून!’
अक्षयच्या या ट्विटने त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला असून, प्रत्येकजण त्यांच्या-त्यांच्या पद्धतीने अक्षयच्या ट्विटचा अर्थ काढत आहेत. कोणी असे म्हणत आहे की, अक्षयचे हे ट्विट त्याच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाशी संबंधित आहे, तर कोणी म्हणत आहे की, अक्षय नक्कीच काही तरी नवे करण्याच्या विचारात आहे. मात्र अक्षयने ज्या पद्धतीने ट्विटच्या अखेरीस ‘कमिंग सून’ हा शब्दप्रयोग केला त्यावरून त्याच्या आगामी ‘२.०’ या चित्रपटाशी हे ट्विट निगडीत असावे, असा निष्कर्ष काढला जात आहे.
एकीकडे मोठमोठ्या दिग्गज सुपरस्टार्सचे चित्रपट फ्लॉप होत असताना, अक्षयच्या चित्रपटाने शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, अक्षय काय गुड न्यूज देणार? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

}}}} ">Ab toh excitement se pet mein kicks bhi start ho gaye hain,control nahi ho raha...I'm sure you'll are also curious to know why. #ComingSoon— Akshay Kumar (@akshaykumar) September 1, 2017काही दिवसांपूर्वीच अक्षयच्या ‘२.०’ या चित्रपटाशी निगडीत एक व्हिडीओ समोर आला होता. हा चित्रपट दिग्दर्शक शंकर यांच्या ‘रोबोट’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षयकुमार यांच्या दमदार भूमिका बघावयास मिळणार आहे. त्यामुळे अक्षयचे हे ट्विट याबाबतचे संकेत देत आहे की, चित्रपटाचा ट्रेलर लवकरच रिलीज केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कदाचित अक्षयने हे ट्विट केले असावे. दरम्यान, अक्षयचा ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला असून, त्याने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली आहे.
Ab toh excitement se pet mein kicks bhi start ho gaye hain,control nahi ho raha...I'm sure you'll are also curious to know why. #ComingSoon— Akshay Kumar (@akshaykumar) September 1, 2017