जॅकलिन फर्नांडिसच्या आवडीचा छंद कोणता? जाणून घ्यायचेय मग वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 18:31 IST2017-01-01T18:31:11+5:302017-01-01T18:31:11+5:30

श्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस ही बॉलिवूडची ‘चुलबुली गर्ल’ केव्हा बनली कळालेच नाही. सतत काही ना काही शिकत असते, अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये ...

What is the favorite hobby of Jacqueline Fernandes? If you want to know, then read ... | जॅकलिन फर्नांडिसच्या आवडीचा छंद कोणता? जाणून घ्यायचेय मग वाचा...

जॅकलिन फर्नांडिसच्या आवडीचा छंद कोणता? जाणून घ्यायचेय मग वाचा...

रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस ही बॉलिवूडची ‘चुलबुली गर्ल’ केव्हा बनली कळालेच नाही. सतत काही ना काही शिकत असते, अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये व्यस्त असते. अलीकडेच कळाले होते की, ती कॉर्चेव्हल शिकतेय आणि आता पुन्हा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती पुन्हा एक छंद जोपासतेय. ठाऊक आहे कोणता तो? होय, घोडेस्वारी करणे हा तिच्या आवडीचा छंद आहे. यामुळे आपल्याला कुठलाही आजार जडत नाही, असे तिला वाटते. सध्या ती दक्षिण मुंबईच्या हॉर्स रायडिंगच्या क्लबमध्ये घोडेस्वारी करते आहे.

                           

तुम्हाला वाटत असेल की जॅकी तिच्या आगामी चित्रपटासाठी घोडेस्वारी शिकतेय? तर तुम्ही चुकताय. ती घोडेस्वारी हा तिचा छंद म्हणून जोपासते आहे. तिच्या छंदाविषयी सांगते,‘मला घोडेस्वारी आवडते. बहारीनमध्ये असताना पासून मी घोडेस्वारी करतेय. तेथून मी श्रीलंका आणि नंतर  मुंबई येथे आले. दरम्यान, माझा छंद जोपासण्यात खंड पडला. मात्र, आजही मी सकाळी ५ वाजता उठते आणि ६ वाजेपर्यंत घोडेस्वारी करते. घोडेस्वारी म्हणजे विविध आजारांवर रामबाण उपाय आहे. एवढेच काय पण, मला जर घोडेस्वारीविषयक भूमिका मिळाली तर मी नक्कीच तो चित्रपट डोळे बंद करून स्वीकारेल.’ 

                             

अलीकडेच जॅकी ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी तिच्या घरी आली होती. तिच्या गर्लगँगसोबत ती ‘जिनेव्हा’ येथे गेली होती. ती तेथून परतल्याबरोबर तिचे सिद्धार्थ मल्होत्रासोबतचे शूटिंगचे शेडयूल ठरलेले होते. त्यामुळे तिला कितीही वाटत असले तरी शूटिंगकडेच तिचे लक्ष वळवावे लागले.

Web Title: What is the favorite hobby of Jacqueline Fernandes? If you want to know, then read ...