काय सांगता..! फक्त ७५ रुपयात Amitabh Bachchan झाले करोडपती, कसे ते जाणून घ्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 12:20 PM2022-12-06T12:20:44+5:302022-12-06T12:21:07+5:30

Amitabh Bachchan : 'या' एका गोष्टीमुळे अमिताभ बच्चन करोडपती झाले आहेत.

What do you say..! Amitabh Bachchan became a millionaire in just 75 rupees, know how? | काय सांगता..! फक्त ७५ रुपयात Amitabh Bachchan झाले करोडपती, कसे ते जाणून घ्या?

काय सांगता..! फक्त ७५ रुपयात Amitabh Bachchan झाले करोडपती, कसे ते जाणून घ्या?

googlenewsNext

बॉलिवूडचे सुपरस्टार म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आयुष्यात खूप स्ट्रगल केला आहे. एकेकाळी बिग बी कर्जामध्ये बुडाले होते. 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) या लोकप्रिय कार्यक्रमातून लोकांना करोडपती बनविणारे अमिताभ बच्चन करोडपती झाले आहेत. त्यासाठी त्यांनी एक छोटीशी गोष्ट केली. आज ते मालामाल झाले आहेत आणि तेही फक्त ७५ रुपयांमध्ये... आता तुम्ही म्हणाल की, हे कसे शक्य आहे. याबद्दल जाणून घेऊयात. 

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एका छोट्या कंपनीचे (multibagger returns from smallcap) शेअर्स विकत घेतले होते. पाच वर्षांपूर्वी शेअर मार्केटमध्ये आलेल्या आयपीओमध्ये (IPO) त्यांनी ७५ रुपयांचे शेअर खरेदी केले होते. आज या शेअरमुळे अमिताभ बच्चन यांना १३, ४१,१८,४०० कोटी रुपये मिळवून दिले आहेत. 

बिग बींचा दीर्घकालीन स्मॉलकॅप स्टॉक (NSE SME exchange) ठेवण्याचा संयम फायद्याचा ठरला आहे. कारण डीपी वायर्सचे शेअर्स २०१७ पासून ५ पटीने वाढले आहेत. ५ ऑक्टोबर २०१७ रोजी NSE इमर्ज प्लॅटफॉर्मवर स्टॉक लिस्ट झाल्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत अमिताभ बच्चन यांची होल्डिंग २.४५% शेअर्सवर तशीच होती. डीपी वायर्समध्ये बिग बींच्या गुंतवणुकीचे सध्याचे मूल्य जवळपास १३.४ कोटी रुपये आहे. 

आता शेअरची ही आहे किंमत

सोमवारच्या व्यवहारात NSE वर शेअर ४०८ रुपये प्रति शेअरच्या आसपास होता. आतापर्यंत कॅलेंडर वर्षात, त्यात जवळपास 58% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांना बंपर रिटर्न मिळतं आहेत. ट्रेंडलाइन डेटानुसार, बिग बींकडे फक्त एक स्टॉक आहे. कंपन्यांचा उल्लेख फक्त अशा भागधारकांच्या नावाने केला जातो ज्यांचं कंपनीत १ टक्क्यापेक्षा जास्त हिस्सा असतो. यापूर्वी बिग बींच्या स्टॉक पोर्टफोलिओमध्ये (Stock portfolio) फिनोटेक्स (Phenotex), बिर्ला पॅसिफिक मेडस्पा (Birla Pacific Medspa) आणि न्यूलँड लॅब्सचे (Newland Labs) शेअर्सचा देखील समावेश आहे.

Web Title: What do you say..! Amitabh Bachchan became a millionaire in just 75 rupees, know how?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.