​डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक्स-वाईफसोबत काय करतेयं मल्लिका शेरावत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 14:30 IST2017-07-26T09:00:54+5:302017-07-26T14:30:54+5:30

अभिनेत्री मल्लिका शेरावत हिचे पाय भारतात फार कमी टिकतात.भारतापेक्षा ती विदेशातच अधिक असते. आता तिथे काय करते, हा शोधपत्रकारितेचा ...

What do you do with Donald Trump's X-Wife Mallika Sherawat? | ​डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक्स-वाईफसोबत काय करतेयं मल्लिका शेरावत?

​डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक्स-वाईफसोबत काय करतेयं मल्लिका शेरावत?

िनेत्री मल्लिका शेरावत हिचे पाय भारतात फार कमी टिकतात.भारतापेक्षा ती विदेशातच अधिक असते. आता तिथे काय करते, हा शोधपत्रकारितेचा विषय आहे. त्यात आपण पडायला नको. पण सध्या मल्लिका एका प्रसिद्ध महिलेला भेटून सुखावली आहे. होय, ही महिला कोण? तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पत्नी इवाना ट्रम्प. इवानासोबतचा सेल्फी मल्लिकाने तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. सोबतच इवानाला भेटून झालेला आनंदही व्यक्त केला आहे. ‘इवानासोबत भेटून छान वाटले. ती एक भारदस्त व्यक्तिमत्त्व आहे,’ असे तिने लिहिलेयं.



इवाना ही डोनाल्ड ट्रम्प यांची एक्स वाईफ आहे, अर्थात केवळ हीच तिची ओळख नाही. यापेक्षा इवानाची स्वत:ची एक स्वतंत्र ओळख आहे. होय, इवाना ही एक मॉडेल राहून चुकली आहे. सध्याचे म्हणाल तर, चेक रिपब्लिकमधील एक प्रतिष्ठित व्यावसायिका, अशी इवानाची ओळख आहे. १९७७ मध्ये इवानाने ट्रम्प यांच्याशी विवाह केला. मात्र हे नाते अल्पजीवी ठरले. १९९२ मध्ये दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्यात. पण ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झालेत आणि इवानाचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. आताश: जेव्हा केव्हा ट्रम्प यांच्या खासगी आयुष्याच्या गप्पा होतात, तेव्हा इवानाचा उल्लेख हमखास येतोच. या इवानाला भेटण्याची संधी मल्लिकाने घेतली. आता या भेटीचे औचित्य काय, हे मात्र तिने स्पष्ट केले नाही.
 मल्लिका शेरावत दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डर्टी पॉलिटीक्स’ या चित्रपटात ती अखेरची दिसली होती. यानंतर २०१६ मध्ये ‘टाइम राइडर्स’ या चीनी चित्रपटात ती झळकली होती.  

Web Title: What do you do with Donald Trump's X-Wife Mallika Sherawat?