कॅटरिना कैफने काय म्हटले असावे, ज्यामुळे एक्स बॉयफ्रेंड सलमान खानने तोंड लपविले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 22:23 IST2017-07-26T16:53:23+5:302017-07-26T22:23:23+5:30

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड सध्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मोरोको येथे आहेत. ...

What could have been said by Katrina Kaif, which led to the ex-boyfriend Salman Khan! | कॅटरिना कैफने काय म्हटले असावे, ज्यामुळे एक्स बॉयफ्रेंड सलमान खानने तोंड लपविले!

कॅटरिना कैफने काय म्हटले असावे, ज्यामुळे एक्स बॉयफ्रेंड सलमान खानने तोंड लपविले!

लिवूडचा दबंग सलमान खान आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड सध्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मोरोको येथे आहेत. या चित्रपटातून कॅट आणि सलमान तब्बल पाच वर्षांनी एकत्र येत आहेत. सध्या कॅट आणि सलमान चित्रपटातील काही महत्त्वपूर्ण अ‍ॅक्शन सीन्स शूट करीत असून, त्यासाठी प्रचंड मेहनत करीत आहेत. शिवाय हे दोघेही शूटिंगदरम्यानचे काही फोटोज् त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर करीत आहे. कॅटने नुकताच सेटवरील एक फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. फोटोमध्ये कॅट सलमानसोबत दिसत आहे. परंतु या फोटोत एक गंमत असल्याने दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

दोघांचा हा फोटो निरखून बघितल्यास असे लक्षात येईल की, कॅटने असे काही तरी म्हटले असावे ज्यामुळे सलमानला हसू आवरणे शक्य झाले नसावे. अखेर त्याने तोंड लपवून प्रतिक्रिया नोंदविल्याचे फोटोत दिसते. कॅटदेखील सलमानकडे हसतमुखानेच बघत आहे. त्यामुळे दोघांमध्ये एखाद्या भन्नाट विषयावर चर्चा रंगलेली असावी असेच काहीसे दिसत आहे. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कॅटने त्याच्यासोबत एकही चित्रपट केला नाही; मात्र ‘टायगर जिंदा है’मधून हे दोघे पुन्हा एकदा एकत्र बघावयास मिळणार आहेत. 

पाच वर्षांनंतर एकत्र येत असलेल्या या दोघांमधील केमिस्ट्री चित्रपट रिलीज होण्याअगोदरच दिसून येत आहे. सलमानने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते की, हा चित्रपट त्याच्या ‘एक था टायगर’पेक्षा अधिक जबरदस्त असेल. चित्रपटात प्रचंड अ‍ॅक्शन सीन्स असल्याने प्रेक्षकांना एका नवी अनुभूती मिळेल. ‘टायगर जिंदा है’ची कथा तेथूनच सुरू होणार आहे, ज्याठिकाणी ‘एक था टायगर’ची कथा संपली होती. 

दरम्यान ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट २०१२ मध्ये आलेल्या सुपरहिट ‘एक था टागयर’चा सीक्वल आहे. हा एक स्पाय थ्रिलर असेल. चित्रपट याच वर्षी ख्रिसमसला रिलीज होणार आहे. दरम्यान सलमानचा ‘ट्यूबलाइट’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल फ्लॉप ठरल्याने त्याला या चित्रपटातून प्रचंड अपेक्षा आहेत. शिवाय एक्स गर्लफ्रेंडबरोबर काम करताना सलमान चांगलाच उत्साहात दिसत आहे. 

Web Title: What could have been said by Katrina Kaif, which led to the ex-boyfriend Salman Khan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.