विराट-अनुष्काच्या वेडिंग व्हिडिओग्राफरने रणबीर-आलियाच्या लग्नाला दिला होता नकार, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 11:02 AM2024-07-11T11:02:14+5:302024-07-11T11:04:15+5:30

विशाल पंजाबी या व्हिडिओग्राफरने विराट-अनुष्का, दीपिका-रणवीर, सिद्धार्थ-कियारा या सेलिब्रिटींचं लग्न शूट केलं. पण आलिया भट का दिला नकार?

wedding videographer of Anushka sharma Virat Kohli rejected to cover Alia Bhatt Ranbir Kapoor s wedding | विराट-अनुष्काच्या वेडिंग व्हिडिओग्राफरने रणबीर-आलियाच्या लग्नाला दिला होता नकार, कारण...

विराट-अनुष्काच्या वेडिंग व्हिडिओग्राफरने रणबीर-आलियाच्या लग्नाला दिला होता नकार, कारण...

विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) लग्नाचा व्हिडिओ चाहत्यांच्या मनात आजही घर करुन आहे. इटलीमध्ये दोघांचं लग्न पार पडलं होतं. त्यांचे लग्नातील फोटो, व्हिडिओ खूप व्हायरल झाले. वेडिंग व्हिडिओग्राफर विशाल पंजाबीने हे लग्न शूट केलं होतं. त्याची 'द वेडिंग फिल्मर' ही टीम आहे. यानंतर त्यांनी दीपिका-रणवीर, किआरा-सिद्धार्थ यांचंही लग्न कव्हर केलं. मात्र विशाल पंजाबीने रणबीर कपूर- आलिया भटच्या (Ranbir Kapoor-Alia Bhatt)लग्नाला नकार दिला होता. यामागे काय कारण होतं जाणून घेऊया.

वेडिंग व्हिडिओग्राफर विशाल पंजाबीने (Vishal Punjabi) नुकतंच एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यामध्ये त्याने सेलिब्रिटी वेडिंग, तसंच इतर वेडिंग, लग्नातील विधी, तयारी या सर्व गोष्टींचा अनुभव सांगितला. यावेळी त्याने सेलिब्रिटींच्या वेडिंगसाठी इतर लग्न रद्द करत नसल्याचं सांगितलं. तो म्हणाला "मी रणबीर आणि आलियाचं लग्न कव्हर करायला नकार दिला होता. कारण मला तेव्हाच लंडनला दुसरं वेडिंग कव्हर करण्यासाठी जायचं होतं. सेलिब्रिटींचं लग्न सीक्रेट असतं. ते मला दोन आठवडे आधी सांगतात. मी तेव्हा उपलब्धच नव्हतो त्यामुळे मी स्पष्ट नाही म्हणालो. सेलिब्रिटींच्या लग्नासाठी मी इतरांना दिलेला शब्द मोडत नाही. दुसरं लग्न असेल आणि तेव्हाच सेलिब्रिटीचं लग्न आलं तर मी नाही म्हणतो."

"रणबीर आलियाच्या लग्नावेळीच लंडनमध्ये एक लग्न कव्हर करायचं होतं. ते खूपच छान लग्न झालं. नवरी खूप सुंदर होती.  तो फार छान अनुभव होता. सेलिब्रिटींसाठी मी हे कॅन्सल करणार नाही. रणबीर आलियाला नंतर नक्कीच चांगला वेडिंग व्हिडिओग्राफर मिळाला असेल."

विशाल पंजाबीने १४ वर्षांपूर्वी वेडिंग शूट करण्यास सुरुवात केली. दोन वर्षांपासून त्याला आता यात चांगलं यश मिळालं. आज त्याच्या या छोट्या स्टार्टअपचं 'द वेडिंग फिल्मर' नावाने मोठी कंपनी झाली आहे. 

Web Title: wedding videographer of Anushka sharma Virat Kohli rejected to cover Alia Bhatt Ranbir Kapoor s wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.