लग्नाआधीच अर्जुन झाला बाबा, गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने शेअर केला मुलाचा पहिला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 12:37 IST2019-07-20T12:36:59+5:302019-07-20T12:37:19+5:30

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमिट्रिएड्सने गुरूवारी मुलाला जन्म दिला आहे.

Before the wedding, Arjun Rampal became father, Girlfriend Gabriella Demetriades shared baby's first photo | लग्नाआधीच अर्जुन झाला बाबा, गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने शेअर केला मुलाचा पहिला फोटो

लग्नाआधीच अर्जुन झाला बाबा, गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने शेअर केला मुलाचा पहिला फोटो

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमिट्रिएड्सने गुरूवारी मुलाला जन्म दिला आहे. अर्जुन हॉस्पिटलमध्ये मुलाला आणि गॅब्रिएलाला भेटायला जातो. अर्जुनच्या मुलाचा फोटो पाहण्यासाठी सर्वच जण आतुर झाले आहेत. यादरम्यान त्याच्या मुलाचा पहिला फोटो गॅब्रिएलानं शेअर केला आहे. 


अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड ग्रॅब्रिएलाने इंस्टाग्राम स्टोरीवर अर्जुन आणि त्याच्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत बाळाकडे अर्जुन खूप प्रेमानं पाहताना दिसतोय. या फोटोत बाळाचा चेहरा दिसत नाही. मात्र त्याचे छोटे छोटे हात दिसत आहेत.


ग्रॅबिएलाने आणखीन एक फोटो शेअर केला आहे.ज्यात अर्जुन एक क्युट टेडिबियरसोबत उभा असल्याचा दिसतो आहे. अर्जुनच्या मुलीदेखील गॅब्रिएला आणि बेबी बॉयला भेटण्यासाठी हॉस्पिटलला जातात.


अर्जुन आणि मेहर यांचा अद्याप कायदेशीररित्या घटस्फोट झाला नसून अर्जुन गॅब्रिएलासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. आता गॅब्रिएलाला पूत्र रत्न प्राप्त झाला आहे. गॅब्रिएलाच्या प्रेग्नेसीविषयी कोणतीही तक्रार नसल्याचे मेहरने सांगितले होते. त्यामुळे गॅब्रिएलाच्या डोहाळजेवणामध्ये मेहरचे महत्वाचे योगदान होते.


अर्जुनला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. त्यांची नावं माहिका आणि मायरा आहेत. मेहर जेसिका आणि अर्जुनने एकमेकांसोबत 20 वर्ष संसार केला. पत्नी मेहर जेसिकासोबत घटस्फोट झाल्यानंतर अर्जुन गॅब्रिएलात गुंतला. हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. यानंतर अनेक इव्हेंटला दोघेही एकत्र दिसू लागलेत. 


 गेल्या काही महिन्यांपासून अर्जुन त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत बिनधास्तपणे मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत होता. गॅब्रिएला एक आफ्रिकी मॉडेल आहे.


‘सोनाली केबल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता.

पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. 

Web Title: Before the wedding, Arjun Rampal became father, Girlfriend Gabriella Demetriades shared baby's first photo