आली रे आली, ‘राधे’वरची व्हॅक्सिन आली...! ‘द फॅमिली मॅन 2’चा ट्रेलर पाहून चाहते झाले सैराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 15:03 IST2021-05-19T15:02:05+5:302021-05-19T15:03:06+5:30

Family Man Season 2 Trailer : ‘द फॅमिली मॅन 2’चा ट्रेलर पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात. सोबत या ट्रेलरची प्रशंसा करणारे तितकेच जबरदस्त मीम्सही व्हायरल झालेत.

web series review manoj bajpayee the family man 2 trailer memes goes viral |  आली रे आली, ‘राधे’वरची व्हॅक्सिन आली...! ‘द फॅमिली मॅन 2’चा ट्रेलर पाहून चाहते झाले सैराट

 आली रे आली, ‘राधे’वरची व्हॅक्सिन आली...! ‘द फॅमिली मॅन 2’चा ट्रेलर पाहून चाहते झाले सैराट

ठळक मुद्दे‘द फॅमिली मॅन 2’चा ट्रेलर जबरदस्त आहे. 2 मिनिटे 49 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयीने साकारलेल्या श्रीकांत तिवारीची कथा दिसते.

अभिनेता मनोज वाजपेयीच्या (Manoj Bajpayee) ‘द फॅमिली मॅन’चा पहिला सीजन तुफान गाजला होता. आता या वेबसीरिजचा दुसरा सीझन अर्थात ‘द फॅमिली मॅन 2’  ( The Family Man 2) प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. आज या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि ट्रेलर पाहून चाहते अगदी भारावले. सोशल मीडियावर चाहत्यांनी एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात. सोबत या ट्रेलरची प्रशंसा करणारे तितकेच जबरदस्त मीम्सही व्हायरल झालेत. (Family Man Season 2 Trailer)

एका युजरने तर इतकी भन्नाट प्रतिक्रिया दिली की, त्या प्रतिक्रियेने सगळ्यांचेच लक्ष वेधले. ‘अखेर सलमानच्या राधेवरची व्हॅक्सिन सापडली’ असे या युजरने लिहिले. ‘राधेवरची व्हॅक्सिन 4 जूनला येतेय, अपॉइमेंट तयार ठेवा,’ असे एका युजरने लिहिले.



एका युजरने यापुढची कमेंट केली. ‘मी मनोरंजनाचा पहिला डोस घेतलााये आणि 4 जूनला दुसरा डोस घेणार आहे,’ असे या युजरने लिहिले.

एकंदर काय तर ‘द फॅमिली मॅन 2’चा ट्रेलर पाहून लोक प्रचंड उत्सुक दिसले. येत्या 4 जूनला ‘द फॅमिली मॅन 2’ प्रदर्शित होत आहे. अ‍ॅमेझॉन प्राईमवर ही वेबसीरिज प्रेक्षकांना बघता येईल.

कसा आहे ट्रेलर

‘द फॅमिली मॅन 2’चा ट्रेलर जबरदस्त आहे. 2 मिनिटे 49 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयीने साकारलेल्या श्रीकांत तिवारीची कथा दिसते. या सीझनमध्ये श्रीकांत तिवारी नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्पर्धी राजीचा सामना करणार आहे. विशेष म्हणजे, साऊथ स्टार सामंथा अक्किनेनी हिने यात राजीची भूमिका साकारली आहे. एक फॅमिली मॅन व जागतिक दजार्चा गुप्तचर अशा दुहेरी भुमिकेत मनोज वाजपेयीला पाहणे चाहत्यांसाठी एक ट्रीट असणार आहे.
‘द फॅमिली मॅन 2’ ही सीरिज 12 फेब्रुवारी 2021 रोजी अ‍ॅमेझॉन प्राइमवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार होती. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.  या सीरिजच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. मनोज वाजपेयी आणि समंथासोबत प्रियामणि, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

Web Title: web series review manoj bajpayee the family man 2 trailer memes goes viral