बापलेकीची ही मिठी...! सासरे विलासराव देशमुख यांच्या आठवणीने गहिवरली जेनेलिया, रितेशही झाला हळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 11:57 IST2021-05-26T11:55:18+5:302021-05-26T11:57:02+5:30

Vilasrao Deshmukh birth anniversary : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज 76 वी जयंती. बाबाच्या वाढदिवशी अभिनेता रितेश-जेनेलियाने भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

we miss you everyday Riteish Deshmukh genelia dsouza remember vilasrao deshmukh on his birth anniversary | बापलेकीची ही मिठी...! सासरे विलासराव देशमुख यांच्या आठवणीने गहिवरली जेनेलिया, रितेशही झाला हळवा

बापलेकीची ही मिठी...! सासरे विलासराव देशमुख यांच्या आठवणीने गहिवरली जेनेलिया, रितेशही झाला हळवा

ठळक मुद्देसासरे विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जेनेलियाने दरवर्षीप्रमाणेच खास फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज (26 मे) 76 वी जयंती. बाबाच्या वाढदिवशी अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh ) एक भावुक पोस्ट केली आहे. सून जेनेलिया डिसुजा देशमुख ( Genelia D'souza  Deshmukh)हिनेही सास-यांसाठी एक भावुक पोस्ट लिहिली आहे.  बापलेकीची ही मिठी  चिरंतन राहील, अशा आशयाचे कॅप्शन देत जेनेलियाने पोस्ट शेअर केली आहे.

रितेशची पोस्ट

रितेशने बाबासोबतचा एक जुना फोटो शेअर करत, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘देवा कृपा कर आणि घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरव... तुमच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही बाबा... हॅपी बर्थ डे...,’ असे ट्विट रितेशने केले आहे. गेल्यावर्षी रितेशने विलासरावांच्या 75 व्या जयंतीदिनी एक हृदयस्पर्शी व्हिडीओ शेअर केला होता. 

विलासरावांचे जॅकेट न्याहाळत असताना त्यातून त्यांचा हात बाहेर येतो आणि रितेशच्या डोक्यावरून मायेने फिरतो, त्याची पाठ थोपटतो, असा एक क्रिएटिव्ह व्हिडीओ रितेशने सोशल मीडियावर शेअर केला होते. बाप-लेकाची ही गळाभेट पाहताना अनेकांचे डोळे भरून आले होते.

सूनबाईही गहिवरली

सास-यांच्या आठवणीने जेनेलियाही गहिवरली़.  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि वडिलांच्या जागी असलेले सासरे विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जेनेलियाने दरवर्षीप्रमाणेच खास फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा, आम्ही रोज तुमची आठवण काढतो. बापलेकीची ही मिठी  चिरंतन राहील, असे कॅप्शन देत जेनेलियांना विलासरावांना मारलेल्या मिठीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो रितेश-जेनेलियाच्या लग्नातील आहे. रितेशनेही हा फोटो रिट्वीट केला आहे.

Web Title: we miss you everyday Riteish Deshmukh genelia dsouza remember vilasrao deshmukh on his birth anniversary