Watch Video : टायगर श्रॉफने चेहरा झाकून केला लोकलने प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 14:05 IST2017-03-08T08:35:38+5:302017-03-08T14:05:38+5:30
बॉलिवूडमध्ये स्टंट आणि डॅशिंग अंदाजासाठी ओळखला जाणारा अभिनेता टायगर श्रॉफ याने यावेळेस असा काही रिअल लाइफ स्टंट केला की तुम्ही चकित होऊन जाल.

Watch Video : टायगर श्रॉफने चेहरा झाकून केला लोकलने प्रवास
ब लिवूडमध्ये स्टंट आणि डॅशिंग अंदाजासाठी ओळखला जाणारा अभिनेता टायगर श्रॉफ याने यावेळेस असा काही रिअल लाइफ स्टंट केला की तुम्ही चकित होऊन जाल. सध्या टायगर त्याच्या ‘मुन्ना मायकल’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र अचानकच त्याला रिअल लाइफ स्टंट करण्याचे सुचले अन् चेहरा झाकून तो लोकलमध्ये चढला. संपूर्ण चेहरा झाकलेला असल्याने त्याला कोणीही ओळखले नाही. परंतु जेव्हा त्याने त्याच्या लोकल प्रवासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला तेव्हा त्याच्या या कारनाम्याची माहिती पुढे आली.
मुंबईची लाइफ लाइन असलेल्या लोकलची सेलिब्रेटींमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. त्यामुळे बहुतांश सेलिब्रेटींनी लोकलचा रोमांच अनुभवला आहे. टायगरनेदेखील वसई ते बांद्रा असा प्र्रवास करून लोकलचा थरार अनुभवला. त्याचे झाले असे की, टायगर वसईमध्ये त्याच्या सिनेमाची शूटिंग करीत होता. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर त्याने लोकलने प्रवास करण्याचे ठरविले. त्याने वसई रेल्वे स्टेशनपर्यंत कारने प्रवास केला. तेथून तो लोकलमधून थेट बांद्रा येथे पोहचला. विशेष म्हणजे त्याने हा प्रवास जनरल डब्यात केल्याने धक्का खात त्याला हा थरार अनुभवा लागला.
">http://
ज्यावेळी तो लोकलमध्ये बसला तेव्हा त्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. त्यामुळे त्याला या दरम्यान कोणीही ओळखले नाही. तो इतर प्रवाशांसोबत उभा राहून बांद्रापर्यंत पोहचला. सध्या टायगर त्याच्या आगामी ‘मुन्ना मायकल’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा मायकल जॅक्सनसाठी ट्रिब्यूट असणार आहे. या सिनेमात टायगर डान्सरच्या भूमिकेत झळकणार असून, तो मायकल जॅक्सनचा जबरदस्त फॅन आहे.