Watch Video: रणबीर कपूर -आलिया भट्ट यांच्यात बिनसले तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 12:36 IST2019-02-15T12:35:17+5:302019-02-15T12:36:47+5:30

काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट याच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. आता त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा जोरात आहे. आलिया रणबीरच्या प्रेमात आकंठ बुडालीय, हे तर स्पष्ट आहे. त्यामुळे रणबीर समोर असला की, आलिया सगळे काही विसरते. पण रणबीरच्या मनात काय सुरु आहे, हे कळायला मार्ग नाही.

 Watch Video: Ranbir Kapoor and Alia Bhatt caught in an argument | Watch Video: रणबीर कपूर -आलिया भट्ट यांच्यात बिनसले तरी काय?

Watch Video: रणबीर कपूर -आलिया भट्ट यांच्यात बिनसले तरी काय?

ठळक मुद्देहोय, काल-परवा ‘गली बॉय’च्या स्पेशल स्क्रिनिंगला आलिया व रणबीर एकत्र पोहोचलेत. एका गाडीतून पोहोचलेत. पण यावेळी ‘मामला’ काही वेगळाच दिसला.

काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट याच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. आता त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा जोरात आहे. आलिया रणबीरच्या प्रेमात आकंठ बुडालीय, हे तर स्पष्ट आहे. त्यामुळे रणबीर समोर असला की, आलिया सगळे काही विसरते. पण रणबीरच्या मनात काय सुरु आहे, हे कळायला मार्ग नाही. होय, काल-परवा ‘गली बॉय’च्या स्पेशल स्क्रिनिंगला आलिया व रणबीर एकत्र पोहोचलेत. एका गाडीतून पोहोचलेत. पण यावेळी ‘मामला’ काही वेगळाच दिसला. होय, स्क्रिनिंग संपल्यानंतर थिएटरमधून बाहेर येईपर्यंत रणबीर व आलिया यांच्यात सगळे काही ‘गुडी गुडी’ होते. अगदी कॅमेºयाला पोझ देताना दोघेही हसत होते. पण यानंतर दोघेही कारमध्ये बसले आणि अचानक आलियाचा चेहरा उतरला. रणबीर कपूरच्या चेह-यावरचे भावही बिघडले. कारमध्येचं दोघांत वाद झाला. रणबीर आलियाला काहीतरी म्हणतोय आणि ते ऐकताच आलियाच्या चेह-यावरचे हसू गायब होते. दोघांमध्ये असे काय बिनसले, कुठल्या गोष्टीवरून बिनसले, हे कळायला मार्ग नाही. पण कारमधील दोघांचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय.


विशेष म्हणजे, या व्हिडिओनंतर चाहतेही कन्फ्युज आहेत. खरचं रणबीर व आलियामध्ये सगळे काही ठीक आहे ना? असा प्रश्न त्यांनाही पडलाय. काही चाहत्यांनी तर आलियाला रणबीरसोबत ब्रेकअप करण्याचा सल्ला दिला आहे. तू रणबीरसाठी बनलेली नाहीच. त्याच्यासोबत असताना तुझ्या चेह-यावरचे निरागस हसू दूर कुठेतरी पळून जाते. तेव्हा विचार कर, अशा आशयाच्या प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी दिल्या आहेत. अर्थात काहींच्या मते, रणबीर व आलिया कुठलाही वाद नाही. सगळे काही निव्वळ गैरसमज आहे.
आता कुणाचे खरे, कुणाचे खोटे हे कळेलचं. शेवटी काळ प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतोच.

Web Title:  Watch Video: Ranbir Kapoor and Alia Bhatt caught in an argument