Watch VIDEO: ‘क्वांटिको गर्ल’ प्रियांका चोप्राचा आफ्रिकन बच्चेकंपनीसोबत एकच कल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2017 14:13 IST2017-05-08T08:43:53+5:302017-05-08T14:13:53+5:30
युनिसेफ ग्लोबल अॅम्बेसिडरपदी प्रियांकाची निवड झालीय, हे तुम्हाला ठाऊक आहेच. याचअंतर्गत प्रियांका अनेक देशांत फिरते आहे. सध्या प्रियांका साऊथ आफ्रिकेत आहे आणि येथील बच्चे कंपनीसोबत मस्ती करण्यात तिने कुठलीही कसर सोडलेली नाही.

Watch VIDEO: ‘क्वांटिको गर्ल’ प्रियांका चोप्राचा आफ्रिकन बच्चेकंपनीसोबत एकच कल्ला!
‘ ्वांटिको गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या आफ्रिकेतील काही गावांना भेटी देत फिरते आहे. होय, युनिसेफ ग्लोबल अॅम्बेसिडरपदी प्रियांकाची निवड झालीय, हे तुम्हाला ठाऊक आहेच. याचअंतर्गत प्रियांका अनेक देशांत फिरते आहे. सध्या प्रियांका साऊथ आफ्रिकेत आहे आणि येथील बच्चे कंपनीसोबत मस्ती करण्यात तिने कुठलीही कसर सोडलेली नाही. बच्चे कंपनीसोबतच्या या धम्माल क्षणांचे काही व्हिडिओ तिने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत. या मुलांना आनंदाने जवळ घेताना, त्यांच्यासोबत डान्स करताना, त्यांच्यासोबत वेगवेगळे गेम्स खेळतानांचे प्रियांकाचे हे व्हिडिओ पाहणे निश्चितपणे आनंददायी आहे.
यातील आफ्रिकेतील बच्चेकंपनीसोबत प्रियांकाने केलेल्या पोल डान्सचा व्हिडिओ म्हणजे तर एकदम धम्माल आहे.
हा पोल डान्स नेहमीपेक्षा वेगळा असला तरीही पोल डान्सविषयी प्रियांकाच्या मनात असलेली भीती काही कमी झाली नाहीये, हेच व्हिडिओ पाहताना दिसते. एका खांबावरुन सर्रकन खाली येणाºया लहानमुलाच्या मागोमाग प्रियांकाचा नंबर लागतो. पण खांबावरून सर्रकन खाली येणे प्रियांकासाठी इतके सोपे नव्हतेच मुळी. ‘मी खरंच खूप घाबरले होते. पोल डान्स नको रे बाबा,’ असे तिच्या चेहºयावर स्पष्टपणे दिसतेय. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ शेअर करताना तिने हेच कॅप्शन दिलेय. एका व्हिडिओमध्ये प्रियांका या मुलांसोबत ‘बिंदी बॉण्डिंग’ गेम खेळतेय.
ALSO READ : ‘मेट गाला २०१७’: प्रियांका चोप्राचा घेरदार ‘घागरा’ ठरला ‘ब्रेकिंग न्यूज’!
याशिवाय त्यांच्यासोबत धम्माल डान्स करतानाही ती दिसतेय. तिच्या या धम्माल मस्तीचे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले, हे आम्हाला लगेच कळवा.
प्रियांकाचा ‘बेवॉच’ हा हॉलिवूडपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रियांका व्यस्त होणार आहे.