Watch Video : पती अभिषेक बच्चनसह ऐश्वर्या रायने वडिलांच्या अस्थिंचे केले विसर्जन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 18:20 IST2017-08-05T12:50:45+5:302017-08-05T18:20:45+5:30

ऐश्वर्याने वडिलांच्या अस्थिंचे विसर्जन केले असून, यावेळी पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या उपस्थित होते. यावेळी ऐश्वर्या खूपच भावुक झाल्याचे दिसून आले.

Watch Video: Aishwarya Rai with her husband Abhishek Bachchan did the blessings of his father! | Watch Video : पती अभिषेक बच्चनसह ऐश्वर्या रायने वडिलांच्या अस्थिंचे केले विसर्जन!!

Watch Video : पती अभिषेक बच्चनसह ऐश्वर्या रायने वडिलांच्या अस्थिंचे केले विसर्जन!!

जी मिस वर्ल्ड आणि प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिचे वडील कृष्णा राय यांनी याच वर्षी १८ मार्च रोजी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, आज ऐश्वर्याने वडिलांच्या अस्थिंचे विसर्जन केले असून, यावेळी पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या उपस्थित होते. यावेळी ऐश्वर्या खूपच भावुक झाल्याचे दिसून आले. अश्रुनयनांनी तिने वडिलांच्या अस्थिंचे विसर्जन केले. यावेळी ऐश्वर्याची आई वृंदा राय यादेखील उपस्थित होत्या. 

आजतकने दिलेल्या माहितीनुसार ऐश्वर्या पती अभिषेकसोबत बोट क्लब येथून अलाहाबाद येथील ‘संगम’ घाट पोहोचली. ज्याठिकाणी ऐश्वर्यासह संपूर्ण परिवाराने जवळपास एक तास पूजा केली. त्यानंतर अतिशय भावनिक वातावरणात वडिलांच्या अस्थिंचे विसर्जन केले. बच्चन आणि राय परिवाराचा हा कार्यक्रम माध्यमांपासून दूर ठेवण्यात आला होता. अस्थि विसर्जन केल्यानंतर संपूर्ण परिवार थेट वाराणसीकडे रवाना झाला. 



ऐश्वर्या तिच्या वडिलांची लाडकी होती. ऐश्वर्यादेखील वडिलांच्या खूपच क्लोज होती. त्यामुळेच जेव्हा तिचे वडील आजारी राहत असत तेव्हा ती सर्व कामे सोडून वडिलांच्या काळजी घेत असे. ऐश्वर्याला नेहमीच तिच्या वडिलांबरोबर कुठल्या ना कुठल्या इव्हेंटमध्ये बघितले जात होते. असेही म्हटले जात आहे की, जेव्हा सलमान खानने ऐशच्या वडिलांकडे ऐशसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती तेव्हा त्यांनी सलमानला स्पष्ट शब्दात नकार दिल्याचे सांगितले जाते. वडिलांच्या नकारानंतरच ऐश्वर्याने सलमानसोबत अंतर निर्माण केल्याचे बोलले जाते. 



वास्तविक कृष्णा राय गेल्या कित्येक वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होते. त्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली होती. काहीकाळ त्यांच्या प्रकृतीत सुधारणादेखील झाली होती. परंतु या वर्षाच्या सुरुवातीपासून त्यांची प्रकृती खूपच बिघडली होती. ऐश्वर्यानेदेखील सर्व कामे सोडून वडिलांच्या प्रकृतीची काळजी घेतली. त्यांना ती सातत्याने रुग्णालयात दाखल करीत असे. 

Web Title: Watch Video: Aishwarya Rai with her husband Abhishek Bachchan did the blessings of his father!