WATCH THIS: रणवीर सिंग आणि फराह खान यांचा स्वीमिंगपूल शेजारी रोमान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 11:32 IST2017-02-12T05:57:46+5:302017-02-12T11:32:20+5:30
एका जाहिरातीच्या चित्रिकरणादरम्यान रणवीर सिंगचा फराह खानसोबत दंगामस्ती करतानाचा हा व्हिडिओ तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल. ‘खून भरी मांग’ या चित्रपटातील ‘मैं तेरी हूं जानम’ या गाण्यावर ते नाचताना दिसतात.

WATCH THIS: रणवीर सिंग आणि फराह खान यांचा स्वीमिंगपूल शेजारी रोमान्स
र वीर सिंग आणि फराह खान यांचा स्वीमिंगपूल शेजारी रोमान्स
एका जाहिरातीच्या चित्रिकरणादरम्यान रणवीर सिंगचा फराह खानसोबत दंगामस्ती करतानाचा हा व्हिडिओ तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल. ‘खून भरी मांग’ या चित्रपटातील ‘मैं तेरी हूं जानम’ या गाण्यावर ते नाचताना दिसतात.
रणवीर सिंग त्याच्या मस्तीखोर स्वभावासाठी ओळखला जातो. तो जातो तेथे स्वत:च्या एनर्जीमुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. तसेच तो इंटरनेवर मजेशीर व्हिडिओ पोस्ट करण्यासाठीदेखील प्रसिद्ध आहे. नुकतेच त्याने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मधील आयकॉनिक ट्रेन सीन कोरिओग्राफर गणेश आचार्यसोबत रिक्रीएट केला होता.
आता यावेळी त्याने फराह खानसोबत स्वीमिंगपूलशेजारी रोमान्स करतानाचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. एका जाहिरातीच्या चित्रिकरणादरम्यान फराह खानसोबत दंगामस्ती करतानाचा हा व्हिडिओ तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल.
‘खून भरी मांग’ या चित्रपटातील ‘मैं तेरी हूं जानम’ या गाण्यावर ते नाचताना दिसतात. फराहची तब्येत ठिक नसल्यामुळे तिचा मूड फ्रे श करण्यासाठी रणवीरने तिच्यासोबत सेल्फी काढल्या, तसेच हा व्हिडिओसुद्धा बनवला. मूळ गाण्याप्रमाणे हा व्हिडिओसुद्धा त्यांनी स्वीमिंगपूल शेजारीच शूट केला आहे. किरण बेदी आणि सोनू वालियाचे ते ओरिजनल गाणे सेन्शुअस होते तर फराह-रणवीरचा रोमान्स फार गंमतीशीर आहे. व्हिडिओच्या शेवटी ती त्याला स्वीमिंगपूलमध्ये ढकलून देते.
आधी तुम्ही तो पाहा...
हा व्हिडिओ शेअर करतान रणवीरने ‘खून भरी मांग’ असे कॅप्शन दिले. त्याला फराहने ट्विट करून धन्यवाद दिले की, ‘रणवीर तुझ्यासोबत तु मलादेखील वेडेपणा करण्यास भाग पाडतो. म्हणून तर तुझ्यासोबत काम करताना नेहमीच मजा येते.’
फराहने इन्स्टाग्रामवर रणवीरसोबतचा एक सेल्फी पोस्ट केला. त्यामध्ये ते दोघे ‘प्रिन्सेस’ नाव लिहिलेल्या टोप्या आणि स्टार आकाराचे फनी गॉगल परिधान केलेले आहेत. त्यासोबत कॅप्शन दिले की, ‘रणवीर सिंग म्हणजे सगळ्यात कूल ‘प्रिन्सेस’ आहे!’
रणवीर सध्या संजय लीला भंसाळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ची शूटींग करीत असून यामध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोन आणि शाहिद कपूर आहे. त्यानंतर तो झोया अख्तरच्या ‘गली बॉय’मध्ये काम करणार असून आलिया भट्ट त्याची अभिनेत्री असणार.