WATCH: जॅकी चॅन, सोनू सूद आणि दिशा पटानीचा ‘कुंग फू योगा’ ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 10:57 IST2016-12-31T10:57:56+5:302016-12-31T10:57:56+5:30

जॅकी चॅन, सोनू सूद आणि दिशा पटानी स्टारर ‘कुं ग फू योगा’ या चित्रपटाचे ट्रेलर लाँच झाले आहे. स्टॅनली टाँग दिग्दर्शित हा अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट भारत-चीनमध्ये झालेल्या सांस्कृतिक देवाणघेवाण कराराअंतर्गत हा चित्रपट निर्माण करण्यात आलेला आहे.

WATCH: Jackie Chan, Sonu Sood and Direcya Patani's 'Kung Fu Yoga' trailer | WATCH: जॅकी चॅन, सोनू सूद आणि दिशा पटानीचा ‘कुंग फू योगा’ ट्रेलर

WATCH: जॅकी चॅन, सोनू सूद आणि दिशा पटानीचा ‘कुंग फू योगा’ ट्रेलर

रत-चीन यांच्यामध्ये झालेल्या करारा अंतर्गत तयार झालेला जॅकी चॅन स्टारर ‘कुंग फू योगा’ चित्रपटाचा ट्रेलर न्यू इयरच्या निमित्ताने इंटरनेटवर दाखल झाला आहे. विविध चीनी आणि भारतीय कलाकारांनी यामध्ये काम केले आहे.

बॉलीवूड अभिनेता सोनू सूद आणि टायगर श्रॉफची ‘कथित’ प्रेयसी दिशा पटानी, अमायरा दस्तूर यामध्ये अ‍ॅक्शन सुपरस्टार जॅकी चॅनसोबत दिसणार आहेत. दिशाने तिच्या चाहत्यांना २०१६ ला सेंड-आॅफ गिफ्ट म्हणून हे ट्रेलर ट्विटरवर शेअर केले आहे.

हाँगकाँग येथील स्टॅनली टाँग याने हा अ‍ॅक्शन अ‍ॅडव्हेंचर चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यामध्ये सोनू श्रीमंत भारतीय व्यसायिक असून दिशा पुरातत्व शास्त्राची प्राध्यापिका आहे. चित्रपटात तिचे नाव अश्मिता असून ती जॅकी चॅनसोबत मिळून मगध साम्राज्याच्या हरवलेल्या खजिन्याचा शोध घेत असते.

                                 

ट्रेलरवरून तरी या सिनेमात फुल आॅन अ‍ॅक्शन, स्टंट, कॉमेडी, धमाल असणार आहे असे दिसतेय. एवढेच नाही तर यामध्ये भारतीय प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी एक बॉलीवूड स्टाईल गाणेसुद्धा असणार आहे. दिशाने तिच्या इन्स्टाग्रामवर हे गाणे नुकतेच पोस्ट केले. फराह खानने हे गाणे कोरिओग्राफ केलेले आहे.

कुर्ता-पायजमा घातलेला जॅकी लहान मुलांसोबत या गाण्यात अत्यंत क्यूट दिसतो. या चित्रपटात एक बॉलिवूड स्टाईल गाणे असावे, अशी सोनूची इच्छा होती. त्याने ही कल्पना चित्रपटाच्या निर्मात्यासह दिग्दर्शक स्टेनली टोंग यांना सांगितली आणि विशेष म्हणजे या दोघांना ती आवडलीदेखील. चित्रपटात बॉलिवूड स्टाईलचे गाणे असल्यामुळे भारतीय प्रेक्षक या चित्रपटाकडे आकर्षित होईल, हा सोनूचा युक्तिवाद होता.

                                 

चीनचे राष्ट्रपती जेव्हा भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा दोन देशांमध्ये संयुक्तपणे तीन चित्रपट निर्माण करण्याचा करार झाला होता. ‘कुंग फू योगा’ हा त्यातील पहिला चित्रपट आहे. 

Web Title: WATCH: Jackie Chan, Sonu Sood and Direcya Patani's 'Kung Fu Yoga' trailer