WATCH....‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेच्या स्विमसूट राऊंडची एक झलक़..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2017 17:21 IST2017-01-29T07:26:29+5:302017-01-29T17:21:25+5:30

तब्बल सतरा वर्षे उलटून गेलीत. गत १७ वर्षांपासून भारताकडे ‘मिस युनिव्हर्स’चा किताब आलेला नाही. त्यामुळेच यंदाचा ‘मिस युनिव्हर्स’ किताब ...

WATCH .... A glimpse of Swimsuit Round of 'Miss Universe' competition. | WATCH....‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेच्या स्विमसूट राऊंडची एक झलक़..

WATCH....‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेच्या स्विमसूट राऊंडची एक झलक़..

्बल सतरा वर्षे उलटून गेलीत. गत १७ वर्षांपासून भारताकडे ‘मिस युनिव्हर्स’चा किताब आलेला नाही. त्यामुळेच यंदाचा ‘मिस युनिव्हर्स’ किताब आपल्याकडे येणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रोश्मिता हरिमुर्थी ही यंदाच्या ‘मिस युनिव्हर्स’ सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करते आहे. येत्या ३० जानेवारीला फिलिपाईन्सची राजधानी मनिला येथे या स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे. या स्पर्धेत रोश्मिताने बाजी मारलीच, तर भारताची गत १७ वर्षांची प्रतीक्षा संपेल. यंदाच्या या स्पर्धेत भारतीय सुंदरी सुश्मिता सेन ही परिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे तसेही या स्पर्धेवर संपूर्ण भारतीयांच्या नजरा राहणार आहेत.

मिस युनिव्हर्स’च्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार,  टॉप १२ स्पर्धकांची पेजन्ट नाईटसाठी निवड केली जाईल.  या स्पर्धेत जगभरातील ८६ सौंदर्यवती सहभागी झाल्या आहेत. सोमवारी ‘मिस युनिव्हर्स’चा ताज कुणाच्या माथ्यावर चढेल, हे कळेल. याच स्पर्धेत स्विमसूट राऊंडमध्ये रॅम्पवॉक करणा-या सौंदर्यवतींची एक झलक खास तुमच्यासाठी.... 

  

 गत गुरुवारीच ‘मिस युनिव्हर्स २०१७’ या स्पर्धेची सुरुवात झाली. पहिला राऊड फिलिपाईन्सच्या पसी शहरात झाला. 



ही स्पर्धा पाहण्यासाठी मॉल आॅफ एशिया एरीना पूर्णपणे पॅक झाला होता.



 पहिल्या राऊंडमध्ये सर्व स्पर्धकांनी जजेसमोर इव्हिनिंग गाऊनमध्ये रॅम्प वॉक केला. 



यानंतर स्विमसूट रॅम्प वॉक झाल्यानंतर पारंपरिक पोशाखातील राऊंडला सुरुवात झाली. 




 

Web Title: WATCH .... A glimpse of Swimsuit Round of 'Miss Universe' competition.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.