जोरदार आहे सलमान खानचा 'अंतिम'मधला लूक, आयुष शर्माने शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 10:48 IST2020-12-10T10:46:37+5:302020-12-10T10:48:12+5:30

सलमान खानने गुपचुप आपल्या पुढचा सिनेमा 'अंतिम'च्या शूटिंगला सुरूवात केली आहे.

Watch first look of salman khan in antim the final truth aayush sharma shares the video | जोरदार आहे सलमान खानचा 'अंतिम'मधला लूक, आयुष शर्माने शेअर केला व्हिडीओ

जोरदार आहे सलमान खानचा 'अंतिम'मधला लूक, आयुष शर्माने शेअर केला व्हिडीओ

बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय कलाकारांपैकी एक असलेल्या सलमान खानच्या सिनेमाची  प्रतीक्षा चाहते कधीपासून करतायेत. सलमानचा 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई' हा सिनेमा यंदा ईदच्या निमित्ताने प्रदर्शित होणार होता पण कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले. आता 'राधे'चे शूटिंग पूर्ण झाले असून पोस्ट प्रॉडक्शनचे कामही सुरू आहे. दरम्यान, सलमान खानने गुपचुप आपल्या पुढचा सिनेमा 'अंतिम'च्या शूटिंगला सुरूवात केली आहे.

सलमानचा मेहुणा आयुष शर्माने सलमानच्या फर्स्ट लूकचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या सिनेमात सलमान एका शीख पोलिस कर्मचाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तर आयुष शर्मा एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. सलमानचा व्हिडिओ शेअर करताना आयुषने लिहिले की, ''अंतिम  सुरुवात झाली.' व्हिडिओमध्ये सलमान काळ्या पगडी आणि खालसा लॉकेट घालून भाजी मार्केटमधून जाताना दिसतो आहे.

मीडिया रिपोर्टनुसार 16 नोव्हेंबरपासून पुण्यात या सिनेमाचे शूटिंग सुरू झाले. मात्र, त्यावेळी फक्त आयुष शुटिंग करत होता. सलमान खान दोन तीन दिवसा आधीच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. हा सिनेमा 'मुळशी पार्टन' या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक असून महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन करित आहेत.

Web Title: Watch first look of salman khan in antim the final truth aayush sharma shares the video