watch : ​चुलबुली कंगना राणौत बघायचीयं? मग ‘सिमरन’चा ट्रेलर बघा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 10:44 IST2017-08-09T05:14:28+5:302017-08-09T10:44:28+5:30

कंगना राणौतचा ‘सिमरन’ हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीस येतो आहे. काल या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले होते. पाठोपाठ आज चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज केला गेला.

watch: Chubby kangana rayout? Then watch 'Simran' trailer !! | watch : ​चुलबुली कंगना राणौत बघायचीयं? मग ‘सिमरन’चा ट्रेलर बघा!!

watch : ​चुलबुली कंगना राणौत बघायचीयं? मग ‘सिमरन’चा ट्रेलर बघा!!

लिवूड अभिनेत्री दोन कारणांनी सतत चर्चेत असते. एक म्हणजे तिचे बेधडक वक्तव्य आणि दुसरे म्हणजे, तिचे चित्रपट. सध्या कंगना कुठल्याही वक्तव्यामुळे नाही तर तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. होय, कंगनाचा ‘सिमरन’ हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीस येतो आहे. याच चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल आम्ही बोलतोय. काल हंसल मेहता दिग्दर्शित या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले होते. पाठोपाठ आज चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज केला गेला. हा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्ही ‘सिमरन’ पाहण्यासाठी आतूर व्हाल, हे आम्ही दाव्यानिशी सांगतो.



ट्रेलरमध्ये कंगना चित्र-विचित्र हरकती करताना दिसतेय. कंगना अशी का करतेय,तुम्ही सांगू शकता? नाही, तर आम्हीच तुम्हाला सांगतो. या चित्रपटात कंगना चोर बनली आहे. त्यामुळे चित्रपटात प्रत्येकापासून स्वत:ची ओळख लपवण्याचे प्रयत्न करताना ती दिसणार आहे. संपूर्ण ट्रेलरमध्ये कंगनाचा परफॉर्मन्स अफलातून आहे. प्रत्येक फ्रेममध्ये तिच्या अभिनयाची जादू दिसतेय.  कंगनाचे ‘क्वीन आणि ‘तनु वेड्स मनु’ हे चित्रपट तुम्हाला आवडले असतील तर ‘सिमरन’चा ट्रेलर तुम्ही न चुकता बघायलाच हवा. कारण यात तिच चुलबुली कंगना तुम्हाला भेटणार आहे.  तेव्हा ट्रेलर बघा आणि तो बघितल्यानंतरच्या तुमच्या भावना आम्हाला नक्की कळवा.
काही दिवसांपूर्वी   ‘मणिकर्णिका :द क्वीन आॅफ झांसी’च्या शूटिंग दरम्यान कंगनाला अपघात झाला होता. यानंतर ती विश्रांतीसाठी काही दिवस आपल्या हिमाचलमधल्या घरी गेली होती. या चित्रपटात कंगना राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारणार आहे. कगंनासह यात अंकिता लोखंडे आणि अतुल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  

Web Title: watch: Chubby kangana rayout? Then watch 'Simran' trailer !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.