'ॲनिमल'मध्ये रणबीरपेक्षा बॉबी देओलचीच झाली जास्त चर्चा? अभिनेता म्हणाला- माझ्या १५ मिनिटांना किंमत नसती, जर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:47 IST2025-10-07T19:46:41+5:302025-10-07T19:47:23+5:30
Animal Movie : २०२३ मध्ये जेव्हा रणबीर कपूरचा 'ॲनिमल' चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटात बॉबी देओलने केवळ १५ मिनिटांचा कॅमिओ रोल केला होता.

'ॲनिमल'मध्ये रणबीरपेक्षा बॉबी देओलचीच झाली जास्त चर्चा? अभिनेता म्हणाला- माझ्या १५ मिनिटांना किंमत नसती, जर...
२०२३ मध्ये जेव्हा रणबीर कपूर(Ranbir Kapoor)चा 'ॲनिमल' चित्रपट (Animal Movie) प्रदर्शित झाला, तेव्हा त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले. यात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाची जोडी प्रेक्षकांना आवडली. हा चित्रपट प्रामुख्याने वडील-मुलगा यांच्या नात्याच्या कथेवर आधारीत होता, ज्यात अनिल कपूर यांनी वडिलांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला.
या चित्रपटात बॉबी देओलने केवळ १५ मिनिटांचा कॅमिओ रोल केला होता. त्याच्या पात्राचे नाव अबरार हक असे होते. बॉबी देओलचे हे पात्र बोलू शकत नव्हते, पण त्याची उपस्थिती इतकी प्रभावी होती की सर्वत्र त्याच्याच भूमिकेची चर्चा झाली. बॉबीच्या चाहत्यांनी तर असे म्हणायला सुरुवात केली की, त्याने रणबीरला ओव्हरशॅडो केले आहे.
बॉबीने केली रणबीरची स्तुती
आता बॉबीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "ओव्हरशॅडो करण्यासारखं काही नाहीये. रणबीरला जिथे ३ तास चित्रपट सांभाळायचा होता, तिथे मला फक्त १५ मिनिटे सांभाळायची होती. जर रणबीरने ते ४ तास सांभाळले नसते, तर माझ्या १५ मिनिटांना काहीच किंमत राहिली नसती." पुढे रणबीरची स्तुती करताना तो म्हणाला, "रणबीरने ज्या पद्धतीने पात्र साकारले, त्यामुळेच हे सर्व शक्य झाले. जर रणबीरने चांगले काम केले नसते, तर माझ्या एंट्रीचा इतका अर्थ राहिला नसता. ॲक्शनपटात ड्रामा तेव्हाच चालतो, जेव्हा तुमचा हिरो आणि व्हिलन दोघेही मजबूत असतात. दोघांनाही चांगले काम करावे लागते. सुरुवातीपासूनच कोण जिंकणार हे माहीत असेल तर त्यात मजा येत नाही."
'ॲनिमल पार्क २' कधी येणार?
'ॲनिमल'च्या यशानंतर निर्माते या चित्रपटाचा भाग २ (Animal Park) देखील आणणार आहेत. 'ॲनिमल पार्क'च्या प्रदर्शनाबद्दल रणबीरने सांगितले होते की, "ॲनिमल पार्कची सुरुवात २०२७ मध्ये व्हायला हवी. मी आणि संदीप (दिग्दर्शक) यांनी कल्पना, पात्रे आणि संगीतावर चर्चा केली आहे. हे खूप क्रेझी आहे. मी सेटवर जाण्याची वाट पाहत आहे."