वाजिद खानच्या मृत्यूची बातमी ऐकताच पत्नी यास्मीनची झाली अशी अवस्था, मुलांचे डोळे शोधतायेत वडिलांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 17:12 IST2020-06-01T16:58:53+5:302020-06-01T17:12:21+5:30

वाजिद आपल्या मागे पत्नी आणि दोन मुलांसोडून गेला आहे.

Wajid khan is survived by his wife yashmin and two cute kids gda | वाजिद खानच्या मृत्यूची बातमी ऐकताच पत्नी यास्मीनची झाली अशी अवस्था, मुलांचे डोळे शोधतायेत वडिलांना

वाजिद खानच्या मृत्यूची बातमी ऐकताच पत्नी यास्मीनची झाली अशी अवस्था, मुलांचे डोळे शोधतायेत वडिलांना

असे वाटतेय की बॉलिवूडला ग्रहण लागले आहे. आधी इरफान खान मग ऋषी कपूर आणि आता वाजिद खान याच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. वाजिद खान यांचा किडनी इन्फेक्शनमुळे मृत्यू झाला.  42 वर्षांचा वाजिद आपल्या मागे पत्नी आणि दोन मुलांसोडून गेला आहे. 

वाजिदने 2003मध्ये यास्मीनसोबत लग्न केले होते. वाजिद आणि यास्मीन यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. वाजिदच्या जाण्याच्या बातमी ऐकून कुटुंबपत्नी यास्मीन काहीकाळ सुन्न अवस्थेत गेली होती. संपूर्ण कुटुंबीय ही बातमी ऐकताच शॉक झाले होते. 
 


1998 मध्ये साजिद-वाजिद या जोडगोळीने सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाला संगीत देऊन आपल्या करिअरची सुरूवात केली होती. त्यानंतर सलमान खानच्या गर्व, तेरे नाम, पार्टनर, दबंग यांसारख्या चित्रपटांची त्यांनी गाणी लिहिली, गायली आणि संगीतही दिले. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेले सलमान खानचे ‘प्यार करोना’ आणि ‘भाई भाई’ गाणेही साजिद-वाजिद जोडीने संगीतबद्ध केले होते. वाजिद यांचे ते शेवटचे गाणे ठरले.


वाजिद यांनी सलमानसाठी मेरा ही जलवा, फेव्हिकॉल से ही गाणी गायली होती. तर अक्षय कुमारसाठी चिंता ता चिता चिता हे गाणे गायले होते. त्यांनी सध्या लॉकडाऊन काळात सलमानचे प्यार करोना आणि भाई भाई गाणेही कंपोझ केले होते.

Web Title: Wajid khan is survived by his wife yashmin and two cute kids gda

टॅग्स :Wajidवाजिद