विवेक अग्निहोत्रीचा 'द बंगाल फाईल्स' ओटीटीसाठी सज्ज, कधी आणि कुठे पाहाल सिनेमा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 13:05 IST2025-11-09T13:01:20+5:302025-11-09T13:05:21+5:30
विवेक अग्निहोत्रीचा 'द बंगाल फाईल्स' ओटीटीवर प्रदर्शित होणार, कुठे पाहाल?

विवेक अग्निहोत्रीचा 'द बंगाल फाईल्स' ओटीटीसाठी सज्ज, कधी आणि कुठे पाहाल सिनेमा?
बॉलिवूडमध्ये नेहमीच वादग्रस्त पण तितक्याच प्रभावी विषयांवर चित्रपट बनवून खळबळ माजवणारे चित्रपट निर्माता-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) पुन्हा एकदा त्यांच्या एका महत्त्वपूर्ण चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. 'द काश्मीर फाइल्स'च्या जबरदस्त यशानंतर, त्यांनी 'द बंगाल फाइल्स' (The Bengal Files) चित्रपट आणला. अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, सिमरत कौर आणि शाश्वत चॅटर्जी यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेला 'द बंगाल फाइल्स' ५ सप्टेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ज्या प्रेक्षकांना थिएटरमध्ये हा चित्रपट पाहता आला नाही, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 'द बंगाल फाइल्स' ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.
चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी ज्याची आतुरतेने वाट पाहिली, तो 'द बंगाल फाइल्स' आता तुम्ही टीव्ही किंवा मोबाईल स्क्रीनवर घरबसल्या लवकरच पाहू शकता. ZEE5 वर २१ नोव्हेंबर २०२५ रोजी त्याचा डिजिटल प्रीमियर होणार आहे. एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनेवर आधारित हा चित्रपट तुमच्या सोयीनुसार पाहू शकता.
बंगालमधील हिंदू नससंहारवर हा सिनेमा आधारित आहे. 'द बंगाल फाइल्स' या चित्रपटाची कथा विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलेली असून, याची निर्मिती अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी केली आहे. या चित्रपटाची कथा दोन प्रकारचे बंगाल दाखवते, एक आताचा म्हणजेच वर्तमान काळातील आणि एक स्वातंत्र्यपूर्व काळातील. बंगालमधील 'डायरेक्ट अॅक्शन डे' या दिवसाबद्दल सिनेमात माहिती मिळते. त्यावेळी बंगालमध्ये झालेला नरसंहार, क्रुरता यात दाखवण्यात आली आहे. नोआखाली दंगल आणि 'डायरेक्ट अॅक्शन डे' चे सत्य दाखवणारा हा चित्रपट आहे. तेव्हाच्या राजकीय घडामोडी, तेव्हा घेतलेले राजकीय निर्णय ज्याचे परिणाम आजही देशावर उमटतात. अशा बऱ्याच घटना पाहायला मिळतात.