विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्माला अशा अंदाजात दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 14:15 IST2018-03-08T08:45:07+5:302018-03-08T14:15:14+5:30

विराटने त्याच्या आॅफिशियल ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करीत पत्नी अनुष्काला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Virat Kohli's wife Anushka Sharma wishes to give such anecdotes to women! | विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्माला अशा अंदाजात दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा!

विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्माला अशा अंदाजात दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा!

जगभरात महिला दिन साजरा केला जात आहे. बॉलिवूड सेलेब्सदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून जगातिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. याचनिमित्त भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपल्या आॅफिशियल ट्विटर अकाउंटवरून पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासह देशभरातील तमाम महिलांना आपल्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी विराटने एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कुठल्याही एका महिलेला टॅग करा जी एक्स्ट्राआॅर्डिनरी आहे.’ यावेळी विराटने हा व्हिडीओ पत्नी अनुष्काला टॅग केला. 

व्हिडीओमध्ये विराट कोहली प्रश्न करताना बघावयास मिळतो. ‘स्त्री-पुरुष समान का नाहीत? मी अपेक्षा करतो की, असे व्हायला हवे. महिलांचे लैेंगिक शोषण, घरगुती हिंसाचार, विरोध केल्यास धमकी आणि या यादीत अनेक गोष्टींचा समावेश असल्याची वास्तवता आहे. मात्र अशातही महिला पुढे जात असून, आपल्या आयुष्य चमकवित आहेत. अशातही बरेचसे लोक हा विचार करतात की, महिला पुरुषांच्या समान नाहीत. वास्तविक महिला पुरुषांच्या समान नव्हे तर त्यापेक्षाही बेटर आहेत. 
 }}}} ">Tag the extraordinary woman in your life who is #BetterThanEqual@Staywrogn@AnushkaSharma ♥️ pic.twitter.com/NdjNEPYQjD— Virat Kohli (@imVkohli) March 8, 2018
दरम्यान, विराट आणि अनुष्का गेल्यावर्षी विवाहाच्या बंधनात अडकले. या दोघांनी इटली येथे लग्न केले. त्यानंतर दिल्ली आणि मुंबईमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन दिले. साउथ आफ्रिका येथे हनिमून केल्यानंतर काही महिन्यांतच हे दोघे आपापल्या कामात व्यस्त झाले. सध्या अनुष्का तिच्या आगामी ‘सूई-धागा’ य चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती अभिनेता वरुण धवन याच्यासोबत बघावयास मिळणार आहे. विराट आणि अनुष्का नेहमीच एकमेकांच्या कामाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक करीत असतात. 

Web Title: Virat Kohli's wife Anushka Sharma wishes to give such anecdotes to women!