तुम्हाला वर्ल्ड कपचं तिकीट हवं असेल तर...; विराटचा 'भारी' मेसेज, अनुष्काची 'लय भारी' ॲडिशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 13:39 IST2023-10-04T13:37:26+5:302023-10-04T13:39:44+5:30

विराट कोहलीच्या इन्स्टाग्राम पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

virat kohli shared post on world cup amid anushka sharma pregnancy news actress reply | तुम्हाला वर्ल्ड कपचं तिकीट हवं असेल तर...; विराटचा 'भारी' मेसेज, अनुष्काची 'लय भारी' ॲडिशन

तुम्हाला वर्ल्ड कपचं तिकीट हवं असेल तर...; विराटचा 'भारी' मेसेज, अनुष्काची 'लय भारी' ॲडिशन

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली दुसऱ्यांदा आईबाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अनुष्का पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दुसऱ्या प्रेग्नन्सीमुळे अनुष्का अभिनयातून ब्रेक घेणार असल्याच्या चर्चा होत्या. तर प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यानच विराट वर्ल्ड कपचा सराव सोडून अचानक गुवाहाटीवरुन मुंबईत आल्याचंही वृत्त होतं. आता विराट कोहलीच्या इन्स्टाग्राम पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

विराटने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक स्टोरी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने "आता वर्ल्ड कप सुरू होणार आहे. मी माझ्या सगळ्या मित्रांना विनंती करू इच्छितो की कोणीही वर्ल्ड कप मॅचचे तिकीट मागू नका. तुमच्या घरातूनच मॅचचा आनंद घ्या," असं विराटने म्हटलं आहे. विराटच्या या इन्स्टाग्राम स्टोरीला अनुष्काने रिप्लाय दिला आहे. 

एकच चित्रपट, शाहरुखबरोबर रोमान्स, लग्नानंतर बॉलिवूड सोडलं अन्...; आता कार अपघातामुळे चर्चेत आली 'स्वदेस' फेम गायत्री जोशी

अनुष्काने विराटची इन्स्टा स्टोरी तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केली आहे. "आणि तुमच्या मेसेज उत्तर नाही मिळालं तर माझ्याकडे मदत मागण्यासाठी येऊ नका. थँक यू", असं म्हणत अनुष्काने हसण्याचे इमोजीही पोस्ट केले आहेत. विराट आणि अनुष्काच्या या इन्स्टा स्टोरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

विराट आणि अनुष्का हे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. त्यांनी २०१७ मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. अनुष्काने २०२१मध्ये वामिका या त्यांच्या पहिल्या मुलीला जन्म दिला. आता ते पुन्हा आईबाबा होणार असल्याच्या चर्चा आहेत. 

Web Title: virat kohli shared post on world cup amid anushka sharma pregnancy news actress reply