Video: RCB हरली अन् तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळला..; अनुष्काचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 12:38 PM2024-05-23T12:38:07+5:302024-05-23T12:38:23+5:30

काल एलिमिनेटर सामन्यात RCB ला पराभव पत्करावा लागल्याने मैदानावर अनुष्का शर्मा दुःखात दिसली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय

virat kohli RCB lost and Anushka sharma heartbreaking video viral from ahamdabad | Video: RCB हरली अन् तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळला..; अनुष्काचा व्हिडीओ व्हायरल

Video: RCB हरली अन् तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळला..; अनुष्काचा व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री अनुष्का शर्मा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. अनुष्का सध्या पती विराट कोहलीच्या टीमला म्हणजेच RCB ला सपोर्ट करण्यासाठी मैदानात हजर असते. काल राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात RCB चा पराभव केला. त्यामुळे विराटचं स्वप्न पुन्हा भंग झालं. संपूर्ण IPL मध्ये चिवट झुंज देणाऱ्या RCB ला एलिमिनेटर सामन्यात हार पत्करावी लागली. त्यामुळे अनुष्का शर्मा चांगलीच उदास झालेली दिसली. 

अनुष्काचा चेहरा पडला अन्..

काल अनुष्का शर्मा तिचा क्रिकेटपटू पती विराट कोहलीला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चिअर करायला उपस्थित होती.  एलिमिनेटरमध्ये कोहलीच्या संघ आरसीबीचा आरआरकडून पराभव झाला. संपूर्ण सामन्यादरम्यान अनुष्का स्पष्टपणे तणावात दिसली कारण आरसीबीने खेळ त्यांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु RCB हरली. आणि विराट कोहली आणि टीमचं यावर्षीही IPL ट्रॉफी मिळवण्याचं स्वप्न भंगलं.

अनुष्का झाली भावूक

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये अनुष्का तिच्या शेजारी उभ्या असलेल्या लोकांशी खोलवर संवाद साधताना दिसत आहे. अनुष्का  व्हिडिओमध्ये प्रचंड दुःखात दिसलेली तुम्ही बघू शकता. 

अनुष्का शर्माने आरसीबीच्या शेवटच्या काही सामन्यांना हजेरी लावली.  अनुष्का पती विराट आणि त्याच्या संघाला चिअर करताना दिसली. गेल्या आठवड्यात, आरसीबीने सीएसकेविरुद्ध विजय मिळवला आणि प्लेऑफसाठी पात्र ठरले. तेव्हा अनुष्का भावूक झालेली दिसली. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहलीसह तिलाही अश्रू अनावर झाले.

Web Title: virat kohli RCB lost and Anushka sharma heartbreaking video viral from ahamdabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.