'या' खास कारणासाठी विराट कोहलीने केले अनुष्का शर्माशी लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 15:31 IST2018-09-29T15:16:41+5:302018-09-29T15:31:51+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला 11 डिसेंबरला एक वर्ष पूर्ण होणार आहे. विराट नेहमीच आपल्या करिअरमध्ये मिळालेल्या यशाचे श्रेय अनुष्का शर्माला देतो. 

 Virat Kohli married Anushka Sharma for this special Reason! | 'या' खास कारणासाठी विराट कोहलीने केले अनुष्का शर्माशी लग्न!

'या' खास कारणासाठी विराट कोहलीने केले अनुष्का शर्माशी लग्न!

ठळक मुद्देविराटने अनुष्काने सुई-धागा सिनेमात केलेल्या कामाचे कौतुक सोशल मीडियावर केले विराट आणि अनुष्काच्या लग्नाला 11 डिसेंबरला एक वर्ष पूर्ण होणार आहे

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला 11 डिसेंबरला एक वर्ष पूर्ण होणार आहे. विराट नेहमीच आपल्या करिअरमध्ये मिळालेल्या यशाचे श्रेय अनुष्का शर्माला देतो. 

एका इंटरव्हु दरम्यान विराटने सांगितले होते की, आम्ही दोघे सारख्या बकग्राऊंड आहे हे एक खास कारण आहे ज्यामुळे आम्ही एकमेकांना चांगल्या प्रकार समजू शकतो. खूप लोकांना असे वाटते आम्ही फेयरी टेल सारखे आयुष्य जगतो आहे मात्र असे नाहीय, आम्ही ही सामन्य व्यक्तींसारखेच राहतो.  नुकताचे विराटने अनुष्काने सुई-धागा सिनेमात केलेल्या कामाचे कौतुक सोशल मीडियावर केले आहे. विराटने सोशल मीडियावर लिहिले होते की, हा सिनेमा मी दोन वेळा पाहिला आणि पहिल्यापेक्षा दुसऱ्यांदा पाहताना तो अधिक आवडला असे कोहलीने ट्विट केले. तो म्हणाला," सुई-धागा हा सिनेमा मी दोनवेळा पाहिला. मला तो खूप आवडला. अत्यंत भावनिक चित्रपट असून सर्व कलाकारांनी उत्तम काम केले आहे." 

या सिनेमात वरूण धवन मुख्य भूमिकेत आहे आणि मौजी हे कॅरेक्टर प्ले करत आहे. अनुष्का त्याच्या पत्नीच्या ( ममता)  भूमिकेत आहे. विराटने वरुणचे विशेष कौतुक केले आणि अनुष्कानेही चाहत्यांची मनं जिंकल्याचे सांगितले. तो म्हणाला," मौजीची व्यक्तिरेखा वरूणने अप्रतिम साकारली आहे, परंतु ममता या पात्राने माझं मनं जिंकलं. तिची व्यक्तिरेखा इतकी प्रभावी आहे आणि अनुष्काने ती रेखाटण्यासाठी प्राण ओतले आहे. तिचा मला अभिमान आहे."

Web Title:  Virat Kohli married Anushka Sharma for this special Reason!