विराट कोहली गर्लफ्रेंड अनुष्का शर्माला लाडाने ‘या’ नावाने मारतो हाक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 19:46 IST2017-08-22T14:16:06+5:302017-08-22T19:46:06+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील प्रेमाच्या चर्चा दिवसागणिक रंगत आहेत. या ...

Virat Kohli laughs with girlfriend Anushka Sharma! | विराट कोहली गर्लफ्रेंड अनुष्का शर्माला लाडाने ‘या’ नावाने मारतो हाक!

विराट कोहली गर्लफ्रेंड अनुष्का शर्माला लाडाने ‘या’ नावाने मारतो हाक!

रतीय क्रिकेट संघाचा आक्रमक कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील प्रेमाच्या चर्चा दिवसागणिक रंगत आहेत. या दोघांनी अद्यापपर्यंत त्यांच्यातील नाते अधिकृतरीत्या जाहीर केले नसले तरी, त्यांच्यातील प्रेम कधीच लपून राहिले नाही. सध्या विराट श्रीलंका दौºयावर असून, त्याला भेटण्यासाठी अनुष्काही श्रीलंकेला गेली आहे. त्यामुळे स्वाभाविकच दोघे पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आले आहेत. यादरम्यानचे दोघांचे काही फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो दोघे एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत, असेच दिसून येते.

असो, आज आम्ही तुम्हाला दोघांमधील आणखी एक सीक्रेट बाब सांगणार आहोत. अर्थात ही सीक्रेट बाब नुकतीच समोर आली आहे. १५ आॅगस्टला जेव्हा अनुष्का विराटला भेटण्यासाठी श्रीलंकेला गेली होती, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना ही बाब माहिती पडली. त्याचे झाले असे की, विराट आणि अनुष्का त्यांच्या फॅन्समध्ये काही काळ रमले होते. यावेळी विराट जेव्हा अनुष्काला लाडाने हाक मारत होता, तेव्हा तो जे नाव उच्चारत असे, ते एका चाहत्याला कळाले. मग काय, विराट आणि अनुष्काचे हे सीक्रेट काही क्षणातच जगजाहीर झाले. 



कारण ऐवढे मोठे सीक्रेट या चाहत्याने जाहीर केले नसावे तरच नवल. असो, आम्ही तुमची फारशी उत्सुकता वाढविणार नाही. विराट कोहली अनुष्काला लाडाने ‘नुष्की’ या नावाने हाक मारतो. मस्तय ना? या चाहत्याने दोघांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना याबाबतचा खुलासा केला आहे. त्यानंतर काही मिनिटांतच दोघांचे हे सीक्रेट सोशल मीडियावर वाºयासारखे व्हायरल झाले आहे. वास्तविक विराट आणि अनुष्काच्या जोडीला ‘विरुष्का’ नावाने ओळखले जाते. मात्र विराटने अनुष्काला ठेवलेले हे प्रेमळ नाव नक्कीच चाहत्यांना आवडेल यात शंका नाही. 

Web Title: Virat Kohli laughs with girlfriend Anushka Sharma!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.