विम्बल्डनमध्ये विराट-अनुष्का, तर काहीच अंतरावर अवनीत कौर; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:58 IST2025-07-09T12:58:04+5:302025-07-09T12:58:43+5:30

Wimbledon 2025: विराट, अनुष्का आणि अवनीत एका दिवशी, एकाच जागी!

Virat Kohli Anushka Sharma Avneet Kaur Attend Wimbledon 2025 On Same Day | विम्बल्डनमध्ये विराट-अनुष्का, तर काहीच अंतरावर अवनीत कौर; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला केलं ट्रोल

विम्बल्डनमध्ये विराट-अनुष्का, तर काहीच अंतरावर अवनीत कौर; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला केलं ट्रोल

 Wimbledon 2025: सध्या जगभरातील सर्वांचे लक्ष लागले आहे ते विम्बल्डन २०२५ या प्रतिष्ठित टेनिस स्पर्धेकडे. या भव्य स्पर्धेला केवळ टेनिसप्रेमीच नव्हे, तर जगप्रसिद्ध खेळाडू आणि हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंतचे दिग्गजही उपस्थित राहतात. नुकतंच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे स्टार कपल खास विम्बल्डन टेनिस स्पर्धा पाहण्यासाठी पोहचलं होतं. मात्र खऱ्या चर्चेचा विषय ठरली ती म्हणजे अभिनेत्री अवनीत कौर. तीही याच दिवशी आणि त्याच ठिकाणी उपस्थित होती. विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील तिचे फोटो समोर येताच सोशल मीडियावर अवनीतला ट्रेल केलं जात आहे.

विराट आणि अनुष्का हे ७ जुलै रोजी झालेल्या सामन्यात कोर्टसाइडवर उपस्थित होते. अनुष्का पांढऱ्या ब्लेझरमध्ये तर विराट तपकिरी सूटमध्ये अत्यंत एलिगंट दिसत होता. या दोघांचा सामना पाहतानाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तर याच दिवशी अवनीत कौर देखील तिथे उपस्थित होती. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. ती देखील  टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला पाठिंबा देताना दिसली. तिच्या विम्बल्डनमधील फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत लिहिलं, "विराट जिथे जाईल तिथे अवनीत तिथे पोहोचते. तर एकानं लिहलं, "तु विराटचा पाठलाग करत आहे का".

विराट आणि अवनीतचं काय कनेक्शन
काही महिन्यांपुर्वी विराट कोहलीने अवनीत कौरची पोस्ट लाईक केल्यापासून ती चर्चेत आहे. मात्र, नंतर क्रिकेटपटूने स्पष्ट केले की त्याने ते लाइक केले नव्हते, परंतु ते इंस्टाग्रामच्या अल्गोरिथममुळे घडले. तथापि, त्या एकाच लाईकमुळे अवनीतच्या फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली होती, आणि तिच्या ब्रँड व्हॅल्यूवरही त्याचा परिणाम झाला होता. तेव्हापासून, लोक विराट कोहलीचे नाव घेऊन अवनीतच्या पोस्टवर टीका करत असतात.

 


Web Title: Virat Kohli Anushka Sharma Avneet Kaur Attend Wimbledon 2025 On Same Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.