विराट-अनुष्काला राखी सावंतने दिल्या लग्नाच्या शुभेच्छा, शेअर केला विचित्र व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 17:34 IST2017-12-27T12:04:29+5:302017-12-27T17:34:37+5:30

विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत असलेल्या विरुष्काला आयटम गर्ल राखी सावंत हिनेही शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्याचा तिचा अंदाज हटके होता.

Virat-Anuskak gave Rakhi Sawant happy marriage, shared strange video! | विराट-अनुष्काला राखी सावंतने दिल्या लग्नाच्या शुभेच्छा, शेअर केला विचित्र व्हिडीओ!

विराट-अनुष्काला राखी सावंतने दिल्या लग्नाच्या शुभेच्छा, शेअर केला विचित्र व्हिडीओ!

रतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन नुकतेच मुंबई येथे पार पडले. या रिसेप्शन सोहळ्यात क्रीडा विश्वासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज आपल्या परिवारानिशी उपस्थित होते. या नवदांपत्यावर त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी आयटम गर्ल राखी सावंत हिनेही विरष्काला शुभेच्छा दिल्या. राखीने तिच्या सोशल अकाउण्टवर एक व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडीओमध्ये ती खास अंदाजात या नवदांपत्याला शुभेच्छा देताना बघावयास मिळत आहे. शुभेच्छा देताना राखी म्हणत आहे की, ‘विराट आणि अनुष्काला लग्नाच्या भरपूर शुभेच्छा.’ यावेळी राखीने त्यांना तिच्या ब्रॅण्डचे कंडोम वापरण्याचा सल्लाही दिला. व्हिडीओमध्ये राखी म्हणत आहे की, ‘हॅपी मॅरेज लाइफ टू विराट अ‍ॅण्ड अनुष्का. केवळ माझ्या ब्रॅण्डच्या कंडोमचाच वापर करा.’

राखीने काही दिवसांपूर्वीच कंडोमच्या जाहिरात प्रसारणावर सरकारकडून घालण्यात आलेल्या बंदीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यावेळी तिने सरकारवर निशाणा साधला होता. ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. आता विरुष्काला अशा अंदाजात लग्नाच्या शुभेच्छा दिल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखीने याअगोदरही विराट कोहली आणि अनुष्का शर्मा खूपच प्रेमळ कपल असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी आताच त्यांच्या वैवाहिक जीवनात पाऊल ठेवले असून, मी त्यांना कंडोम गिफ्ट करू इच्छिते, जेणेकरून ते सुरक्षित राहतील. शिवाय त्यांनी हा अनुभव त्यांच्या चाहत्यांशीदेखील शेअर करावा.’ असेही राखीने म्हटले होते. 
 

दरम्यान, विराट आणि अनुष्काने गेल्या ११ डिसेंबर रोजी इटली येथे विवाह केला. या विवाह समारंभात मोजकेच लोक उपस्थित होते. त्यामुळे लग्नानंतर या दांपत्याने अगोदर दिल्ली आणि त्यानंतर मुंबई येथे भव्य असे रिसेप्शन दिले. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. हा सोहळा मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. 

Web Title: Virat-Anuskak gave Rakhi Sawant happy marriage, shared strange video!