Viral Post : दिलीप कुमारची नात सायेशाच्या ‘या’ डान्स व्हिडीओने लावली आग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2017 10:41 IST2017-06-13T15:20:09+5:302017-06-14T10:41:11+5:30
‘शिवाय’ची अभिनेत्री आणि सुपरस्टार दिलीप कुमार यांची नात सायेशा हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

Viral Post : दिलीप कुमारची नात सायेशाच्या ‘या’ डान्स व्हिडीओने लावली आग!
‘ िवाय’ची अभिनेत्री आणि सुपरस्टार दिलीप कुमार यांची नात सायेशा हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सध्या धूम उडवून दिली असून, त्यात सायेशाचा डान्स थक्क करणारा आहे. व्हिडीओमध्ये सायेशा एड शिरीन यांच्या ‘शेप आॅफ यू’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. ज्या पद्धतीने हे गाणे हिट होत आहे, त्याच पद्धतीने सायेशाचा या गाण्यावरील डान्सही सुपरहिट होत आहे. सोशल मीडियावर तर सायेशाच्या डान्सची खरपुस चर्चा केली जात आहे.
सायेशाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून, त्यामधील सायेशाचा परफॉर्मन्स बघण्यासारखा आहे. सायेशाने अभिनेता अजय देवगण याच्यासोबत ‘शिवाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. सायेशाला भरभक्कम बॉलिवूड वारसा लाभलेला असून, महानायक दिलीप कुमार यांची ती नात आहे. दरम्यान एड शिरीन यांचे ‘शेप आॅफ यू’ हे गाणे जगभरात सुपरहिट ठरले असून, त्याची धुंद भारतीयांवर देखील स्पष्टपणे दिसत आहे. कारण या गाण्याचे संगीतच असे आहे की, ते कानावर पडदाच पाय थिरकायला लागतात.
या गाण्याचे बरेचसे कवर, रेंडिशन आणि डान्स व्हिडीओ समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री दिशा पाटनी हिने याच गाण्यावर डान्सचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यावेळी दिशाचा हा व्हिडीओ खूपच पॉप्युलर झाला होता. दरम्यान सायेशा सॅगलने बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याअगोदर एका साउथ चित्रपटादेखील काम केले आहे. या चित्रपटातून तिला भरपूर प्रसिद्धीही मिळाली होती. अक्की नेनी स्टारर ‘अखिल’ या चित्रपटातून तिने तिच्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती.