लोकप्रिय अभिनेता मुंबईतील चौपाटी बीचवर नग्नावस्थेत ध्यान करायचा; पत्नीनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 13:28 IST2026-02-08T13:27:13+5:302026-02-08T13:28:24+5:30

विनोद खन्ना आज आपल्यात नसले तरी त्यांच्याबद्दलच्या आठवणी आणि किस्से आजही ताजे आहेत.

Vinod Khanna Meditated Naked At Chowpatty Beach Bollywood Osho Ashram | लोकप्रिय अभिनेता मुंबईतील चौपाटी बीचवर नग्नावस्थेत ध्यान करायचा; पत्नीनेच केला खुलासा

लोकप्रिय अभिनेता मुंबईतील चौपाटी बीचवर नग्नावस्थेत ध्यान करायचा; पत्नीनेच केला खुलासा

बॉलिवूडमध्ये असे अनेक सुपरस्टार होऊन गेले, ज्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी आजही सर्वसामान्यांसाठी कोडं आहेत. असेच एक सुपरस्टार म्हणजे दिवंगत अभिनेते विनोद खन्ना. आपल्या करिअरच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांनी अचानक संन्यास घेतला होता.  एका मुलाखतीत विनोद यांची दुसरी पत्नी कविता खन्ना यांनी खुलासा केला की, विनोद खन्ना हे मुंबईच्या बीचवर नग्न अवस्थेत ध्यान करायचे.

कविता खन्ना यांनी एका मुलाखतीत सांगितले की, विनोद खन्ना यांचा ओढा बालपणापासूनच अध्यात्माकडे होता. अमेरिकेतील ओशो आश्रमात जाण्यापूर्वी त्यांचा हा प्रवास मुंबईतच सुरू झाला होता. कविता खन्ना म्हणाल्या, "पुण्यातील आश्रमात जाण्यापूर्वी विनोद जेव्हा मुंबईत राहत होते, तेव्हा ते मुंबईच्या बीचवर ध्यान करण्यासाठी जात असत. विशेष म्हणजे, तिथे सर्वजण आपले कपडे काढून, समुद्रकिनाऱ्यावर नग्न अवस्थेत ध्यान करत असत आणि विनोद खन्नाही त्यात सहभागी व्हायचे".

विनोद खन्ना हे त्या काळातील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक होते. मात्र, एकामागून एक कुटुंबातील सदस्यांचा झालेला मृत्यू आणि विशेषतः आईच्या निधनानंतर ते आतून पूर्णपणे कोलमडले होते. याच मानसिक अवस्थेत त्यांनी यश, स्टारडम आणि भौतिक सुखाचा त्याग करून ओशो यांच्या चरणी जाण्याचा निर्णय घेतला.

सुपरस्टार ते ओशोंचा 'माळी'
अमेरिकेतील ओरेगॉन येथील ओशो आश्रमात गेल्यानंतर विनोद खन्ना यांनी तिथे अत्यंत सामान्य आयुष्य जगले. ओशोंच्या बागेची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. विनोद खन्ना १७ वर्षांचे असताना त्यांनी 'ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी' हे पुस्तक विकत घेतले होते. योगायोगाने त्याच वेळी ओशो देखील त्याच पुस्तकाच्या दुकानात उपस्थित होते. ही त्यांची पहिली अप्रत्यक्ष भेट होती. पुढे हाच प्रवास त्यांना संन्यासापर्यंत घेऊन गेला. काही वर्षांनंतर ते पुन्हा भारतात परतले आणि २०१७ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत ते चित्रपटसृष्टीत सक्रिय राहिले.

Web Title: Vinod Khanna Meditated Naked At Chowpatty Beach Bollywood Osho Ashram