Genelia D'Souza : आजोबा उत्तर देतील का? विलासरावांच्या स्मृतीदिनी नातवंडांचा प्रश्न, जेनेलियाची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 16:43 IST2022-08-14T16:39:15+5:302022-08-14T16:43:04+5:30

Vilasrao Deshmukh death anniversary, Genelia D'Souza Post : सासरे विलासराव देशमुख यांच्या 10 व्या स्मृतीदिनी जेनेलियानं एक भावुक व हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.

Vilasrao Deshmukh death anniversary Genelia D'Souza share emotional post | Genelia D'Souza : आजोबा उत्तर देतील का? विलासरावांच्या स्मृतीदिनी नातवंडांचा प्रश्न, जेनेलियाची भावुक पोस्ट

Genelia D'Souza : आजोबा उत्तर देतील का? विलासरावांच्या स्मृतीदिनी नातवंडांचा प्रश्न, जेनेलियाची भावुक पोस्ट

रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जेनेलिया डिसूजा ( Genelia D'Souza) हे बॉलिवूडचं क्यूट कपल. प्रेक्षकांचं हे आवडतं कपल नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतं. रितेश व जेनेलिया दोघंही सोशल मीडियावर किती अ‍ॅक्टिव्ह आहेत, हे वेगळं सांगायला नको. दोघंही रोज नवे मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. हे मजेशीर व्हिडीओ रितेश व जेनेलियाच्या व्यावसायिक आयुष्याचा भाग आहेत.  खासगी आयुष्याचं म्हणाल तर, खासगी आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी देखील हे कपलं तितक्याच हळूवारपणे व्यक्त होतं. आता जेनेलियाची ही पोस्ट बघा. सासरे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या 10 व्या स्मृतीदिनी (Vilasrao Deshmukh Death Anniversary) जेनेलियानं एक भावुक व हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत तिने दोन फोटोही शेअर केले आहेत. या फोटोत तिची दोन्ही मुलं रियान आणि राहिल दोघंही आजोबाच्या फोटोजवळ हात जोडून बसलेली दिसत आहेत.  हे फोटो शेअर करत, जेनेलियाने एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे.


 
ती लिहिते,
प्रिय बाबा,
आज रियान व राहिल दोघांनी मला एक प्रश्न केला. आई, जर आम्ही आजोबांना प्रश्न विचारला तर ते उत्तर देतील का? असं त्यांनी मला विचारलं. त्यांच्या या प्रश्नावर मी नि:संशय ‘हो’ असं उत्तर दिलं. तुम्ही त्यांचं ऐकलं तर ते नक्की उत्तर देतील, असं मी त्यांना म्हणाले. 
इतकी वर्षे आम्ही प्रामाणिक तुमच्याशी बोलत राहिलो, प्रश्न विचारत राहिलो आणि आम्हाला प्रत्येवेळी तुमच्याकडून उत्तरंदेखील मिळालं. मला माहित आहे की,  आमच्या कठीण काळात तुम्ही आमच्यासोबत राहिलात, आनंदाच्या क्षणी आमच्यासोबत हसलात. मला माहित आहे की,आमच्या प्रत्येक शंकांचे तुम्ही उत्तर द्याल आणि मला चांगलंच माहितीय की, आत्ताही मी जे काही लिहिलंय, ते तुम्ही नक्की वाचाल.  ‘तुम्ही तुमचे कान आणि डोळे उघडे ठेवा. मी नेहमी तुमच्यासाठी उपलब्ध असेल’, असं तुम्ही म्हटल्याचं मला आठवतंय. पप्पा, तुमची आम्हाला खूप आठवण येते..., अशा आशयाची पोस्ट जेनेलियाने लिहिली आहे.

रितेश देशमुख यानेही बाबांच्या समाधीस्थळाचा फोटो शेअर करत, आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दहा वर्षे झालेत... पण तुमच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही..., असं त्याने लिहिलं आहे.
 

Web Title: Vilasrao Deshmukh death anniversary Genelia D'Souza share emotional post