विक्रांत मेस्सीला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; पत्नीने शेअर केली पोस्ट, आनंद व्यक्त करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 16:28 IST2025-09-24T16:27:47+5:302025-09-24T16:28:45+5:30

नवऱ्याला प्रतिष्ठित पुरस्कार मिळताच पत्नीचा ऊर अभिमानाने भरुन आला

vikrant massey won national award wife sheetal thakur post feeling proud | विक्रांत मेस्सीला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; पत्नीने शेअर केली पोस्ट, आनंद व्यक्त करत म्हणाली...

विक्रांत मेस्सीला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; पत्नीने शेअर केली पोस्ट, आनंद व्यक्त करत म्हणाली...

१२वी फेल सिनेमात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांना प्रेमात पाडणारा अभिनेता विक्रांत मेस्सी. काल ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात विक्रांत मेस्सीलाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्याचा गौरव झाला. विक्रांतची पत्नी शीतलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

शीतलने विक्रांतचा पुरस्कारासोबतचा फोटो शेअर करत लिहिले, "जेव्हाही मला वाटतं की मला तुझा यापेक्षा जास्त अभिमान वाटणार नाही तेव्हाच तू मला आणखी एक कारण देतोस. पहिल्याच राष्ट्रीय पुरस्कारासाठी तुझं खूप अभिनंदन. तू जिथेही जाशील त्या प्रत्येक ठिकाणी तुझ्यासाठी सर्वात जास्त आवाज करणारी मी असेन ही माझ्यासाठी सम्मानाची बाब असेल."


शीतलच्या या पोस्टवर गौहर खान, हिना खान, तमन्ना भाटिया यांनी कमेंट करत विक्रांतचं अभिनंदन केलं आहे. विक्रांतच्या कुटुंबियांना त्याचा अभिमान वाटत आहे. विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता शाहरुख खानलाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाहरुखला ३३ वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच या पुरस्काराने गौरवण्यात आला. विक्रांत आणि शाहरुखला विभागून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

English summary :
Vikrant Massey, celebrated for '12th Fail,' received the National Award for Best Actor. His wife, Sheetal, shared a heartfelt post expressing immense pride and congratulating him on his achievement. She vowed to be his loudest supporter always. Shah Rukh Khan also received an award.

Web Title: vikrant massey won national award wife sheetal thakur post feeling proud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.