चॅलेंज! फोटोतील ‘या’ चिमुरड्याला ओळखलंत? आज आहे सुपरस्टार, सगळेच त्याच्यावर फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 08:00 AM2022-08-24T08:00:00+5:302022-08-24T08:00:01+5:30

Guess The Celebrity: फोटोतील या चिमुरड्याला तुम्ही ओळखलंत का? या चिमुकल्यानं सध्या सगळ्यांना  क्रेझी केलं आहे. अगदी चाहतेच नाही तर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीही त्याच्यावर लट्टू आहेत...

Vijay Deverakonda Childhood pic viral on social media | चॅलेंज! फोटोतील ‘या’ चिमुरड्याला ओळखलंत? आज आहे सुपरस्टार, सगळेच त्याच्यावर फिदा

चॅलेंज! फोटोतील ‘या’ चिमुरड्याला ओळखलंत? आज आहे सुपरस्टार, सगळेच त्याच्यावर फिदा

googlenewsNext

Guess The Celebrity: आवडत्या अभिनेता-अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो चाहते आनंदाने पाहतात. म्हणूनच रोज असे नवे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होतोय. हा फोटो आहे टॉलिवूडच्या एका लोकप्रिय सुपरस्टारचा.  फोटोतील या चिमुरड्याला तुम्ही ओळखलंत का? या चिमुकल्यानं सध्या सगळ्यांना  क्रेझी केलं आहे. अगदी चाहतेच नाही तर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीही त्याच्यावर लट्टू आहेत. लवकरच त्याचा डेब्यू बॉलिवूड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. अद्यापही तुम्ही त्याला ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो. 

फोटोतील हा चिमुकला दुसरा तिसरा कुणी नसून साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत विजयसोबत त्याचा धाकटा भाऊ आनंदही दिसतोय. दोघांचा बालपणीचा हा फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. 

विजय देवरकोंडा चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. फक्त टॉलिवूडचं नाही तर बॉलिवूडमध्येही त्याचे लाखो चाहते आहेत.  ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाने विजयला टॉलिवूडसोबतच बॉलिवूडमध्येही ओळख मिळवून दिली. विजय लवकरच बॉलिवूड डेब्यू करतोय. त्याचा ‘लाइगर’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. येत्या 25 तारखेला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेकदा विजयकडे घरभाडं देण्यासाठीही पैसे नसायचे.  परंतु, विजयने हार मानली नाही. आज विजयचं स्वत:चं प्रॉडक्शन हाउस आहे. कोट्यवधीची प्रॉपर्टी आहे. नेम, फेम सगळं काही मिळवणारा विजय आज 15 कोटींच्या बंगल्यात राहतो.2019 साली वयाच्या 30 व्या वर्षी विजयचं नाव फोर्ब्सच्या यादीत झळकलं होतं. एकेकाळी पैसे नसल्याने बँक अकाउंट सील झालेल्या विजयच्या खात्यात आज कोट्यवधी रुपये आहेत.

Web Title: Vijay Deverakonda Childhood pic viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.