विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा सुपरहिट 'डिअर कॉम्रेड'चा हिंदी रिमेक, 'ही' फ्रेश जोडी दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 10:46 IST2026-01-02T10:45:59+5:302026-01-02T10:46:57+5:30
'डिअर कॉम्रेड' सिनेमाचा मोठा चाहतावर्ग आहे. सिनेमाच्या हिंदी रिमेकसाठी करण जोहरने तयारी सुरु केली आहे.

विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा सुपरहिट 'डिअर कॉम्रेड'चा हिंदी रिमेक, 'ही' फ्रेश जोडी दिसणार
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा गाजलेला 'डिअर कॉम्रेड' सिनेमा आता हिंदीतही येणार आहे. २०१९ मध्ये आलेला हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला. याची कथा, विजय आणि रश्मिकाचा अभिनय, यातील गाणी सगळंच हिट झालं. त्यानंतर लगेच करण जोहरने सहा वर्षांपूर्वीच या सिनेमाचे राइट्स विकत घेतले होते. आता अखेर करण हा प्रोजेक्ट बनवण्याची तयारी करत आहे. विशेष म्हणजे सिनेमात फ्रेश जोडीला संदी देण्यात आली आहे.
मिड डे रिपोर्टनुसार, धर्मा प्रोडक्शन अनेक दिवसांपासून 'डिअर कॉम्रेड'च्या हिंदी रिमेकवर काम करत आहे. यासाठी परफेक्ट कास्टिंगही हवं होतं. आता त्यांनी सिद्धांत चतुर्वेदी आणि प्रतिभा रांटा ही नावं फायनल केली आहेत. सिद्धांतने 'धडक २'मध्ये अप्रतिम काम केलं. सिनेमातील गंभीर सीन्सही त्याने व्यवस्थित पेलले. तर दुसरीकडे प्रतिभा रांटाही अशा सिनेमासाठी परफेक्ट असल्याचं मेकर्सचं म्हणणं ठरलं.
मेकर्स हिंदी रिमेकमध्ये ओरिजनल आर्क कायम ठेवणार आहे तरी याला पॅन इंडिया प्रेक्षकांच्या हिशोबाने बनवलं जाणार आहे. याकडे रुटीन रिमेकसारखं पाहिलं जाणार नाही. नवीन प्रेक्षकांसाठी डिअर कॉम्रेडला पुन्हा बनवण्यात येणार आहे. यासोबत ओरिजनल सिनेमाच्या प्रतिमेला धक्का लागणार नाही याचीही काळजी घेण्यात येणार आहे. हिंदी रिमेकमध्येही विजय आणि रश्मिकालाच घेण्याची चर्चा झाली होती मात्र नंतर फ्रेश जोडीच्या संकल्पनेवरच शिक्कामोर्तब करण्यात आलं.