View Pics : कपूर परिवाराने एकत्र येत लाडकी सून नीतू कपूरचा ‘बर्थ-डे’ केला सेलिब्रेट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 17:24 IST2017-07-08T11:54:42+5:302017-07-08T17:24:42+5:30
बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर परिवाराच्या तिसºया पिढीची सून आणि प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर हिचा ५९वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. ...
.jpg)
View Pics : कपूर परिवाराने एकत्र येत लाडकी सून नीतू कपूरचा ‘बर्थ-डे’ केला सेलिब्रेट!!
ब लिवूडमधील प्रसिद्ध कपूर परिवाराच्या तिसºया पिढीची सून आणि प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर हिचा ५९वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. ७० ते ८०च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर मोहिनी घातलेल्या नीतूचा यावेळचा बथर्ड खूपच स्पेशल असा होता. कारण संपूर्ण परिवार एकत्र आल्याने नीतूचा बर्थ-डे अविस्मरणीय असा झाला. दरम्यान, वाढदिवसाचे औचित्य साधून कपूर परिवाराने एक शानदार पार्टीचे आयोजन केले होते. पती ऋषी कपूर, मुलगा रणबीरसह पार्टीत इतरही परिवारातील सदस्य उपस्थित होते.
![]()
![]()
![]()
![]()
नीतूच्या बर्थ-डे पार्टीचे काही फोटोज् समोर आले असून, यामध्ये नीतू परिवारासोबत खूपच आनंदी दिसत आहे. त्याचबरोबर तिच्या चेहºयावरील एक्साइटमेंट बघण्यासारखी आहे. वास्तविक कपूर परिवार खूप मोठा आहे. परंतु परिवारातील काही लोकच पार्टीत हजर झाले होते. पार्टीत उपस्थित असलेल्यांमध्ये पती ऋषी, मुलगा रणबीर, मुलगी सामरा, रिमा जैन आदी उपस्थित होते. यावेळी रिद्धिमाने बर्थ-डे डिनरचा एक फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मम्मी, वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा!’
![]()
![]()
![]()
![]()
तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की, रणबीर त्याच्या आईशी खूपच क्लोज आहे. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते की, आईच्या जन्मदिवशी मी स्मोकिंग करणे सोडणार आहे. आता त्याने स्मोकिंग करणे सोडले काय? हे लवकरच स्पष्ट होईल. असो रणबीर सध्या त्याच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, प्रेक्षकांना तो प्रचंड आवडला आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील ‘मुसाफिर’ हे गाणेदेखील रिलीज करण्यात आले असून, प्रेक्षकांना ते प्रचंड भावत आहे.