ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 11:35 IST2019-08-10T10:03:51+5:302019-08-10T11:35:13+5:30

विद्या सिन्हा यांनी रजनिगंधा, छोटी छोटी बात, पती पत्नी और वो यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Vidya Sinha Critical In CritiCare Hospital, Put On Ventilator | ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांची प्रकृती चिंताजनक

ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांची प्रकृती चिंताजनक

ठळक मुद्देविद्या यांना सध्या आयसीयु (इन्टेसिव्ह केअर युनिट) मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

रजनिगंधा, छोटी छोटी बात, पती पत्नी और वो यांसारखे उत्कृष्ट चित्रपट बॉलिवूडला दिलेल्या अभिनेत्री विद्या सिन्हा यांची प्रकृती ढासळली असून त्यांना मुंबईतील जुहू येथील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्या यांना दोन-तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना सध्या आयसीयु (इन्टेसिव्ह केअर युनिट) मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

विद्या यांना रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आले, तेव्हापासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या तब्येतीत काहीशा सुधारणा असल्याच्या दिसून आल्या होत्या. मात्र अद्याप त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हेंटिलेटर काढल्यानंतर त्यांना श्वासोच्छवास करायला त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आले आहे.

विद्या सिन्हा यांचे वय ७२ असून त्यांची फुफ्फुसं कमकूवत झाली आहेत. त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून फुफ्फुसाच्या संबंधित आजार आहे. तसेच आता त्यांचे हृदय देखील कमकुवत झालेले आहे. त्यामुळे त्यांना अँजिग्राफी करण्याचा सल्ला काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी दिला होता. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

विद्या यांनी काही वर्षांपूर्वी सलमान खानच्या बॉडीगार्ड या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात कमबॅक केला. त्यानंतर त्यांनी काव्यांजली, कबूल है, कुल्फी कुमार बाजेवाला, चंद्र नंदिनी यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले. त्यांच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले. त्यांनी २००९ मध्ये त्यांचे पती नेताजी साळूंखे यांच्याविरोधात मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काहीच महिन्यात त्या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यांचे हे दुसरे लग्न होते. त्यांचे पहिले लग्न वेंकटेश्वर अय्यर यांच्यासोबत झाले होते. वेंकटेश्वर आणि विद्या पूर्वी एकमेकांच्या शेजारी राहायचे, त्यातूनच त्यांची ओळख झाली आणि त्यांनी लग्न केले होते. अय्यर यांचे निधन १९९६ मध्ये झाले. विद्या आणि अय्यर यांनी १९८९ मध्ये एका मुलीला दत्तक घेतले होते. 

Web Title: Vidya Sinha Critical In CritiCare Hospital, Put On Ventilator