पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लंच डेटला गेली विद्या; कपड्यांवरून पुन्हा आली चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 13:19 IST2017-11-23T07:49:42+5:302017-11-23T13:19:42+5:30

विद्या बालन सध्या चर्चेत असण्याचं कारण म्हणजे तिचा चित्रपट ‘तुम्हारी सुलू’. बॉक्स आॅफिसवर तुफान कमाई करतो आहे. त्यामुळे सध्या ...

Vidya with her husband Siddharth Roy Kapoor; There was talk again from the clothes! | पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लंच डेटला गेली विद्या; कपड्यांवरून पुन्हा आली चर्चेत!

पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लंच डेटला गेली विद्या; कपड्यांवरून पुन्हा आली चर्चेत!

द्या बालन सध्या चर्चेत असण्याचं कारण म्हणजे तिचा चित्रपट ‘तुम्हारी सुलू’. बॉक्स आॅफिसवर तुफान कमाई करतो आहे. त्यामुळे सध्या विद्या भलतीच खूश आहे. अलिकडेच ती पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लंच डेटला गेली होती. विद्या आणि सिद्धार्थ फार कमी वेळा एकत्र सार्वजनिक ठिकाणी दिसतात. नेहमीच साडीमध्ये दिसणारी विद्या या लंच डेटला काहीशी वेगळ्या गेटअपमध्ये दिसली. तिने निळ्या रंगाचा कुर्ता आणि त्याच रंगाची प्लाजो घातली होती. या कपड्यांत ती फार सुंदर दिसत होती. एकमेकांचा हात हातात धरून हे देखणं कपल बाहेर पडताना साऱ्यांच्याच नजरा त्यांच्यावर होत्या.



सार्वजनिक ठिकाणी सिद्धार्थ आणि विद्या एकत्र येणे टाळतात. अनेक दिवसांनी या दोघांना एकत्र पाहिल्यामुळे या दोघांचे चाहते नक्कीच सुखावले असतील यात काही शंका नाही. विद्याही या लंच डेटमुळे सुखावलेली दिसते. या लंच डेटपेक्षा सर्वात जास्त चर्चा कशाची होत असेल तर ती तिच्या ड्रेसची होती. अनेकदा विद्याला साडीमध्येच पाहिले गेले आहे. त्यामुळे कुर्तीमध्ये देखील ती तेवढीच मादक दिसते हे तिने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.



‘द डर्टी पिक्चर’मध्ये ‘उलाला उलाला’ म्हणत प्रेक्षकांना मोहित करणारी विद्या ‘तुम्हारी सुलू’ मध्ये लेट नाइट रेडिओ शोमधून ‘हॅलो’ म्हणत प्रेक्षकांवर जादू करताना दिसते. सिनेमाने आतापर्यंत १६ कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीचे काम करायलाच मिळते असे नाही. मात्र, काही जण याबाबतीत सुदैवी असतात. त्यांना ज्या गोष्टीचा छंद आहे तीच गोष्ट काम म्हणून करण्याची संधी मिळते. साहजिकच या कामातून त्यांना इतरांपेक्षा अधिक आनंद मिळतो, अशा मध्यवर्ती कल्पनेभोवती आधारित विद्या बालनचा ‘तुम्हारी सुलू’ हा सिनेमा सध्या प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.

Web Title: Vidya with her husband Siddharth Roy Kapoor; There was talk again from the clothes!