विद्या झळकणार मराठी चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2016 16:55 IST2016-07-04T11:25:41+5:302016-07-04T16:55:41+5:30

विद्या बालन एक अलबेला या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नुकतीच एका मराठी कार्यक्रमात झळकली होती. त्यावेळी अभिनेता-दिग्दर्शक सुबोध भावे तिथे ...

Vidya Golakare in Marathi film | विद्या झळकणार मराठी चित्रपटात

विद्या झळकणार मराठी चित्रपटात

द्या बालन एक अलबेला या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नुकतीच एका मराठी कार्यक्रमात झळकली होती. त्यावेळी अभिनेता-दिग्दर्शक सुबोध भावे तिथे उपस्थित होता. विद्याने त्यावेळी सुबोधच्या कट्यार काळजात घुसली या चित्रपटाचे कौतुक केले होते. सुबोध हा खूप चांगला दिग्दर्शक असून त्याच्यासोबत काम करायला आवडेल असेही ती त्यावेळी म्हणाली होती. सध्या विद्या तिच्या बेगम जान या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर कथा ऐकण्यासाठी ती सुबोधला भेटणार असल्याचे कळतेय. विद्याला सुबोधच्या चित्रपटाची कथा आवडली तर विद्या मराठी चित्रपटात पुन्हा एकदा झळकणार आहे. 

Web Title: Vidya Golakare in Marathi film