Watch Video : या अभिनेत्रीचा व्हिडीओ झाला व्हायरल, पुन्हा सुरु झाली तीच चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 01:15 PM2019-08-02T13:15:57+5:302019-08-02T13:18:23+5:30

या अभिनेत्रीचा ताजा व्हिडीओ चर्चेचे कारण ठरला आहे.

vidya balan viral video is actress pregnant | Watch Video : या अभिनेत्रीचा व्हिडीओ झाला व्हायरल, पुन्हा सुरु झाली तीच चर्चा 

Watch Video : या अभिनेत्रीचा व्हिडीओ झाला व्हायरल, पुन्हा सुरु झाली तीच चर्चा 

googlenewsNext
ठळक मुद्दे2017 मध्ये ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटात विद्या अखेरची दिसली होती. लवकरच ‘मंगल मिशन’ या चित्रपटात ती दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन तिच्या पर्सनल आयुष्यामुळे कमी आणि सिनेमातील भूमिकांसाठी जास्त चर्चेत असते. मात्र सध्या विद्याच्या पर्सनल लाईफची खूप चर्चा होतेय. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने सन 2012 मध्ये सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केले. यानंतर अनेकदा विद्या प्रेग्नंट असल्याची चर्चा झाली आणि दरवेळी ती अफवा निघाली. पण आता एका मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा विद्या प्रेग्नंट असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. याचे कारण म्हणजे, तिचा एक ताजा व्हिडिओ.


अलीकडे विद्याचा एक ताजा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. यात विद्या ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय. यावर तिने व्हाईट डेनिम जॅकेट कॅरी केले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर विद्या प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरु झाली. अनेक चाहत्यांनी विद्या प्रेग्नंट तर नाही ना? असा सवाल केला. 


2017 मध्ये ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटात विद्या अखेरची दिसली होती. लवकरच ‘मंगल मिशन’ या चित्रपटात ती दिसणार आहे. याशिवाय प्रसिद्ध गणितज्ज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये ती दिसणार आहे.

शकुंतला देवींच्या बायोपिकचे दिग्दर्शन अनु मेनन करणार असून विक्रम मल्होत्रा या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हा सिनेमा २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शकुंतला देवी यांचा जन्म १९२९ मध्ये बंगळूरूमध्ये झाला होता. लहानपणीच त्यांच्या वडिलांना त्यांच्या बुद्धिमत्तेची प्रचिती आली होती. त्यांनी गणिताबरोबर ज्योतिषशास्त्रावर देखील अनेक पुस्तके लिहिली आहेत. १९८२ साली गिनीज बुक आॅफ रेकॉर्डने त्यांच्या कामाची दखल घेतली. 

Web Title: vidya balan viral video is actress pregnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.