"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 10:30 IST2025-11-21T10:30:12+5:302025-11-21T10:30:31+5:30
विद्या बालनचं मराठी प्रेम लपून राहिलेलं नाही. आतादेखील विद्या बालनने एका मराठी गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे.

"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
विद्या बालन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री आहे. टीव्हीपासून अभिनय कारकीर्दीला सुरुवात केलेल्या विद्याने टॅलेंटच्या जोरावर बॉलिवूडमध्ये जम बसवला. विद्या बालनचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. विद्या बालन चाहत्यांना सोशल मीडियावरुन अपडेट्स देत असते. अनेकदा ती रील व्हिडीओही बनवताना दिसते.
विद्या बालनचं मराठी प्रेम लपून राहिलेलं नाही. आतादेखील विद्या बालनने एका मराठी गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे. 'मुरांबा' सिनेमातील "अरे ऐक ना जरा हसतोस का..." या गाण्यावर विद्याने रील बनवला आहे. विद्याने साडीत हा रील बनवला आहे. या व्हिडीओत विद्या लिरिक्सवर लिप्सिंग करताना दिसत आहे. त्यानंतर ती मराठीत "जरा हसतोस का?" असं म्हणत आहे. विद्याचा हा व्हिडीओ चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
"जेव्हा मी तणावाने ग्रासलेली असते, तेव्हा मी माझ्या मनाला हे सांगते", असं मराठीत कॅप्शनही विद्याने या व्हिडीओला दिलं आहे. तिने मिथिला पालकरलाही टॅग केलं आहे. विद्याच्या या व्हिडीओवर मराठी सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. क्रांतीने कमेंट करत "किती गोड असावं कोणी", असं म्हटलं आहे. तर मिथिला पालकरने "ब्युटिफूल" अशी कमेंट केली आहे.